400 किलावॅट वीज वाहिनीचा टॉवर पडतो तेव्हा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

तळोदा ः तळोदा- अक्कलकुवा रोडवरील सतोना फाट्याजवळ सरदार सरोवर येथून येत असलेली 400 किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनीचा टॉवर पडला. त्यामुळे सतोना फाटा परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या हायव्होल्टेज टॉवर पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. 

नक्‍की पहा - पालकमंत्र्यांचा तरुणांना अजब सल्ला.. म्हणाले, परमिट रुम ...

गुजरात राज्यातील सरदार सरोवर येथून महाराष्ट्रात वीज वाहून आणण्यासाठी चारशे किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून असलेली ही वीजवाहिनी परिसरात तिच्या खालून जातांना आवाज होत असल्याने कुतूहलाच्या विषय आहे. याच वहिनीचा एक टॉवर पडल्याने परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान टॉवर शेतात असल्याने शेतकऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. 

दुरूस्तीच्या कामाला सुरवात 
टॉवर पडल्याने वीज वाहिनीचा इतर पोलवर ताण पडून परिणाम झाला आहे. 400 किलोवॅट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज वाहून घेऊन जाणारे हे टॉवर पडल्याने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. दरम्यान या वीज वाहिनीचे देखरेख व दुरुस्तीचे काम स्थानिक पातळीवर होत नसल्याने हा टॉवर उभा करण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सरदार सरोवर येथून निघणारी ही वीज वाहिनी सरदार सरोवर, डेडियापाडा, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, सारंगखेडा, दोंडाईचा मार्गे धुळे व तिथून पुढे गेली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tadoda 400 kw electricity line tower