esakal | महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी 
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी 

शेतकरी हिताच्या व शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी 

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : केंद्र सरकारने शेतकरी हिताचा कायदा केला मात्र महा विकास आघाडी सरकारने त्या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या व किसान मोर्चाच्या वतीने स्थगिती आदेशाची होळी करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. तळोद्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.

आवश्य वाचा- विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !
 

आंदोलनात आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंग राजपूत, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी पंचायत समिती सदस्य विजय राणा ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, महिला मोर्चाच्या भारती कलाल, रसीलाबेन देसाई , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शानूबाई वळवी यांनी सहभाग घेतला.


यावेळी बोलतांना आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की ,महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती आदेश दिला आहे. वास्तविक हा कायदा शेतकरी हिताच्या व शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने देखील करावी.

वाचा-केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांची अवहेलना करणारे 
 

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली. आंदोलनात प्रदीप शेंडे , गोकुळ पवार ,भगवान मगरे बळीराम पाडवी, वीरसिंग पाडवी ,गुड्डू वळवी ,किरण सुर्यवंशी, सांगदेव वळवी व भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 

संपादन- भूषण श्रीखंडे