esakal | स्वातंत्र्य लढ्यात रावलापाणीच्या जंगलात घडले होते भयंकर; नविन आढळल्या खुणा !

बोलून बातमी शोधा

null

स्वातंत्र्य लढ्यात रावलापाणीच्या जंगलात घडले होते भयंकर; नविन आढळल्या खुणा !

sakal_logo
By
सम्राट महाजन
तळोदा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचा ऐतिहासिक सहभाग असल्याचा खुणांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील रावलापाणी येथे पुन्हा नव्याने बंदुकीच्या गोळ्यांचे चार निशाण सापडले आहे. शेतात घुसलेल्या शेळ्यांना हुसकावण्यासाठी गेलेल्या रतिलाल पावरा या युवकाने हे निशाण शोधून काढले. त्यामुळे, परिसरात शोधमोहीम राबविल्यास आणखी काही पुरावे आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, त्या काळी घडलेल्या घटनेवर अधिक प्रकाश पडून इतिहासाचा नव्याने उलगडाही होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
स्वातंत्र्य संग्रामादरम्यान नंदुरबार जिल्ह्यात दोनदा गोळीबार झाल्याची नोंद आहे. त्यांपैकी नंदुरबार येथील एक घटना, तर दुसरी सातपुड्याच्या पर्वतराजीत रावलापाणी येथे २ मार्च १९४३ ला घडली असून, यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या वेळी झालेल्या गोळीबाराचे निशाण आजही निझरा नदीतील खडकावर दिसते.

हेही वाचा: झाडांच्‍या फांद्यांना सलाईन; रूग्‍ण स्‍वतःची खाटच घेवून येत घ्‍यायचे इलाज

दरम्यान, रावलापाणी येथील रतिलाल पावरा या युवकाने शेतात मोठ्या कष्टाने आंब्याची बाग फुलविली आहे. त्याचे शेत घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तेथपर्यंत जाण्यासाठी नदी ओलांडून, डोंगर चढून जावे लागत असल्याने अर्धा तास लागतो. काही दिवसांपूर्वी रतिलाल घरात असताना त्याला शेतात शेळ्या घुसल्याचे दिसले. रतिलाल नेहमीच्या रस्त्याने शेतात गेला असता तर अर्धा तास लागला असता व तोपर्यंत आंब्याच्या बागेचे नुकसान झाले असते. त्यामुळे त्याने खडतर असा जवळचा मार्ग निवडला. या मार्गाने शेतात जात असताना त्याला एका खडकावर कसल्या तरी खुणा दिसल्या. रतिलालने आधी शेतात जाऊन शेळ्यांना हुसकावले व नंतर पुन्हा त्याच रस्त्याने परतत खुणा कसल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी निघाला. खडकाच्या जवळ जाऊन निरखून बघितले असता, त्या बंदुकीच्या गोळीमुळे झालेल्या खुणा असल्याचे दिसून आले. आधीच्या बंदुकीच्या गोळीचे निशाण व आता आढळलेले निशाण यात खूप साम्य आहे. त्यामुळे आता आढळलेले निशाणदेखील त्या वेळेच्या गोळीबाराचेच आहे असा विश्‍वास रतिलालने बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा: पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

आणखी खुणा सापडण्याची शक्यता
नव्याने खुणा सापडलेले ठिकाण पूर्वीच्या निशाणापासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर नदीचा व डोंगराचा आहे. त्यामुळे या परिसरात असा भाग मोठ्या प्रमाणावर आहे, की ज्या ठिकाणी आजदेखील सहसा कोणी जात नाही. त्यामुळे या संपूर्ण परिसरात पुन्हा शोधमोहीम राबविल्यास आणखी निशाण सापडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्या दिवशी वेळ कमी असल्याने कधी नव्हे त्या मार्गाने शेतात जाण्याचे ठरविले. वाटेत बंदुकीचे निशाण दिसून आल्याने मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे या परिसरात शोधमोहीम राबवावी, जेणेकरून आणखी नवीन माहिती उजेडात येऊ शकते.
-रतिलाल पावरा, स्थानिक युवक, रावलापाणी

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात टँकसह चार ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तयारी

रावलापाणी येथे कॅप्टन ड्युमेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गोळीबारात १५ जण शहीद झाल्याचे तत्कालीन ब्रिटिश सरकारने कबूल केले आहे. स्थानिक रतिलालने नव्याने गोळीबाराचे निशाण दुसऱ्या खडकांवर शोधून काढले. बेछूट गोळीबाराचा हा पुरावा नव्हे तर काय?
-डॉ. कांतिलाल टाटिया, सामाजिक कार्यकर्ते, शहादा

संपादन- भूषण श्रीखंडे