गॅस लिक होताच घराला लागली आग..आणि तरुणांचे असे ही साहस !

सुदैवाने या आगीत घरातील गृहिणींनी लहान मुलांना तातडीने दुसऱ्या खोलीत नेल्याने अनर्थ टळला
fire
firefire

तळोदा : येथील बसस्थानकासमोरील चव्हाण बोअरवेल यांच्या दुकानाच्‍या पाठीमागेच राहणाऱ्यांच्‍या घरात (Hoom) गॅस लीकमुळे (Gas leaks) सिलिंडरमधून मोठमोठ्या ज्वाला बाहेर येऊन आग लागली. सिलिंडरमधील ज्वाळांमुळे (cylinder fire ) घरातील सामानाने पेट घेतल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अक्षय तृतीया (Akshay Tritiya) सणासाठी घरात स्वयंपाक सुरू असतानाच ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात तरुणांनी दाखवलेल्या साहसामुळे (young man showed courage) आग विझविण्यात यश आले.

( Hoom Gas leaks cylinder fire young man showed courage fire extinguished)

fire
भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर

तळोदा बसस्थानक समोर विनोद गोरख चव्हाण यांचे श्री दत्त कृपा ट्युबवेल ॲण्ड चव्हाण बोअरवेल नावाचे दुकान आहे. या दुकानाचा मागेच त्यांचे राहते घरही आहे. घरात गृहिणी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस लीक झाला व सिलिंडरमधून मोठमोठ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. त्या ज्वाळांनी लागलीच रौद्र रूप धारण केले व आग इतरत्र पसरू लागली. त्यामुळे महिलांनी आरडाओरड केली. मात्र तोवर स्वयंपाक घर व त्या बाजूला असलेल्या खोलीतील साहित्याने पेट घेतला होता. स्वयंपाक घरातील फ्रीज, मिक्सर, संसारोपयोगी इतर साहित्य तसेच दुसऱ्या खोलीतील वॉशिंग मशीन, कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू सर्व काही जळून खाक झाले. यात घरातील इलेक्ट्रिक फिटिंगही जळाली. सुदैवाने या आगीत घरातील गृहिणींनी लहान मुलांना तातडीने दुसऱ्या खोलीत नेल्याने अनर्थ टळला.

आग लागल्याचे कळताच भैय्या चौधरी, जालिंदर भोई, अशोक पाटील, विवेक चौधरी, कैलास शेंडे, अशोक मराठे, योगेश पाटील,पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांनी घरातील सामान उचलण्यास मदत केली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी तत्परता दाखवली. त्यात कमलेश कलाल, राहुल चव्हाण, युवराज चव्हाण यांनी सहकार्य केले. दरम्यान आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, भास्कर मराठे, जितेंद्र दुबे, संदीप परदेशी, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र माळी, करनिरीक्षक अनिल माळी यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

fire
एका बापाची मुलाला साथ..एका मुलाची बापा विरुद्ध साक्ष

तरुणांचे असेही साहस
आग लागल्याचे कळताच भैय्या चौधरी व जालिंदर भोई या तरुणांनी जिवाची कसलीही पर्वा न करता भयंकर ज्वाळा निघत असलेले गॅस सिलिंडर उचलून बाहेर पळत आणले व बसस्‍थानकासमोरील मैदानात जाऊन ठेवले. त्यामुळे घरातील इतर सामान वाचले व मोठी आग पसरू शकली नाही. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या या साहसाचे शहरात कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com