ग्रहण आहे म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवावा का ?नगरपालिकेने ठेवला पाणीपुरवठा बंद,तुम्हाला काय वाटतं 

residentional photo
residentional photo

नाशिक- ग्रहण म्हटलं म्हणजे त्याविषयी समाजात प्रचंड श्रध्दा,अंधश्रध्दा, उत्सुकता आणि आनंददायी अनुभूती पहायला मिळते. ग्रहण काळात मंत्र उजळण्यापासून तर अमूक करु नये. तमूक करु नये अशा प्रथा परंपरा सांगितल्या आहेत. वैयक्तीक पातळीवर श्रध्देचा भाग म्हणून या प्रथा पाळतातही पण सार्वजनिक पातळीवर जर त्याचा अतिरेक केला तर काय होते. याचा अनुभव आज देशभर प्रसिध्द असलेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांनी घेतला. 

पाणी पुरवठा परिणाम

आज सगळीकडे सुर्यग्रहणाचा आनंद घेतला गेला. सुर्यग्रहण आहे म्हणून आज पारंपारीक श्रध्दा-अंधश्रध्देतून आलेल्या प्रथा परंपराही अनेकांनी पाळल्या. पण त्र्यंबकेश्‍वरला मात्र आज काही स्विकृत नगरसेवकांनी थेट शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या बाबूनी सुचना शिरसावंद्य मानून ग्रहण काळात शहराला पाणीपुरवठाच केला नाही. ग्रहण आणि त्याचा पर्वकाळ संपल्यानंतर शहराला पाणीपुरवठा सुरु केला. 

पाणीपुरवठा ठेवला बंद 
विशेष म्हणजे त्यासाठी त्र्यंबकेश्‍वर शहरातील काही नगरसेवकांनी व्हॉटसवर मेसेज व्हायरल करीत, ग्रहण काळात पाणी वापर निषिध्द असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवल्याचे संदेश प्रसारीत केले. या घटनेला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने हरकत घेत. चौकशीची मागणी केली. अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी ग्रहण काळातील पाणी दूषित असेल तर मग धरणातील पाणी तरी का अडवून ठेवले सगळी धरणच रिकामी का केली नाही. असा प्रश्‍न विचारीत, नगरपालिकेकडे चौकशी करुन संबधितावर कारवाईची मागणी केली आहे. 

धरणच रिकामे करायचे ना 
त्र्यंबकेश्‍वरला ग्रहणातील पाणी दूषित असते म्हणून पाणीपुरवठाच बंद ठेवण्याचा प्रकार अंधश्रध्देला खतपाणी घालणारा आहे. ग्रहणातील पाणी दूषित असेल तर मग धरणातील 
पाणी सोडून का द्यायचे नाही ? यासगळ्या प्रकाराची चौकशी करुन संबधितावर कारवाईसाठी अनिसने नगरपालिकेला पत्र दिले आहे. 
-कृष्णा चांदगुडे (अंधश्रध्दा निमूर्लन समिती) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com