नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणखी दोघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

आजच्या अहवालानुसार ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून आज आणखी ३४ जणांचे स्वॅबतपासणीला पाठविण्यात आले आहेत.तर एकूण १०८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

नंदुरबार : शहाद्यातील प्रतिंबंधित क्षेत्रातील एका पंधरा वर्षीय मुलीला आणि अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ५८ वर्षीय चालकाला आज कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता तेरा झाली आहे. दरम्यान आजच्या अहवालानुसार ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून आज आणखी ३४ जणांचे स्वॅबतपासणीला पाठविण्यात आले आहेत.तर एकूण १०८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहाद्यातील सहा जणांचे स्वॅब घेत त्यांना दाखल करण्यात आले आहे. 

नक्की वाचा : "लॉकडाऊनमध्ये' जिल्ह्यात या कामांना सुट... वाचा सविस्तर ! 
 

शहादा ः शहाद्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाच झाली असून ती नंदुरबारपेक्षा एकने पुढे गेली आहे. पाचपैकी एकाचे यापूर्वीच निधन झाले आहे. आज आढळलेली मुलगी प्रभाग २ मधील असल्याने प्रतिबंधात्मक झोनचे कार्यक्षेत्र वाढविण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आता तरी आरोग्य तपासणीसाठी वाद न घालता पुढे यावे तसेच नियमांचे कसोशीने पालन करावे आसे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे. शहादा येथील ही मुलगी दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. १९ मार्चला सायंकाळपर्यंत कोरोना संसर्गाने निरक आसलेल्या शहाद्यात अवघ्या दहा दिवसात दिवसा आड एक याप्रमाणे ५ रूग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे. शहराच्या गरीब नवाज कॉलनीतील लागण झालेल्या त्या मुलीला यापूर्वीच आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. 

क्‍लिक कराः जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 

 
ऍम्बुलन्स चालकाला झाला संसर्ग 
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटिश अंकुशविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५८ वर्षीय ऍम्बुलन्स चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कातील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राची इमारत सील करण्यात आली आहे. तालुक्याची रुग्णसंख्या आता वाढुन चार झाली आहे. रूग्णाच्या संपर्कात आलेले तालुका वैद्यकीय अधिकारी देखील होमक्वारंटाईन करण्यात आले आहेत. केंद्रातील सुमारे वीस कर्मचारींना त्याच इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन माहिती घेतली व केंद्र सील करण्याचे आदेश दिले. 

आर्वजून पहा :  डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi newsnandurbar Two more corona positive