Marathon Competition in Nandurbar on 14 august news
Marathon Competition in Nandurbar on 14 august newsesakal

Nandurbar Marathon Competition : नंदुरबारात 14 ला मॅरेथॉन स्पर्धा; मंत्री डॉ. गावितांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Nandurbar Marathon Competition : आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीतर्फे वाढदिवसानिमित्त १४ ऑगस्टला नंदुरबार-धुळे जिल्हा मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

स्पर्धा चार गटांत होणार असून, अनुक्रमे यश मिळविणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हानिर्मितीचे शिल्पकार, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या १५ ऑगस्टला साजरा होणाऱ्या‍ वाढदिवसानिमित्त १४ ऑगस्टला सकाळी सातला मॅरेथॉन स्पर्धेला डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरल विहार निवासस्थानापासून सुरवात होणार आहे. (Marathon Competition in Nandurbar on 14 august news)

स्पर्धेत मुले/मुली आठवी ते दहावीसाठी पाच किलोमीटर पुरुष, अकरावी ते सीनिअर कॉलेज यासाठी १० किलोमीटर अंतर व महिला गट अकरावी ते सीनिअर कॉलेज सहा किलोमीटर इतके अंतर आहे. निवासस्थानापासून यशवंत विद्यालय, जीटीपी कॉलेज रोड, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, बस स्टँड, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, उड्डाणपूल, गिरिविहार गेट, स्वागत पेट्रोलपंप, करण चौफुली परत त्याचमार्गे डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन स्पर्धेची सांगता होईल.

स्पर्धेत अकरावी ते सीनिअर कॉलेज पुरुषसाठी अंतर १० किलोमीटर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये असे आहे. अकरावी ते सीनिअर कॉलेज महिलासांठी सहा किलोमीटर अंतर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार व तृतीय दोन हजार रुपये असे असेल.

आठवी ते दहावी मुलेसाठी पाच किलोमीटर अंतर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तर तृतीय तीन हजार रुपये असे पारितोषिक राहील. आठवी ते दहावी मुलींसाठी पाच किलोमीटर अंतर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये असे असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Marathon Competition in Nandurbar on 14 august news
Nandurbar News : तोरणमाळच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; अन्य विद्यार्थीही आजारी...

स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील रहिवासी असावा. रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड आवश्यक आहे. स्पर्धा पूर्ण झाल्यावर एक तासानंतर सर्व गटांतील विजयी तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विजयी खेळाडू नियम व अटींना पात्र ठरला नाही तर त्यास पारितोषिक दिले जाणार नाही. स्पर्धा पूर्ण करताना काही तांत्रिक बाबी व अधिकार आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

येथे जमा करा प्रवेश अर्ज

खेळाडूंचे प्रवेश अर्ज १४ ऑगस्टपर्यंत मीनल वळवी (मो. ९८२२४९०६९३), सॅबस्टीन जयकर (९०७५३६०९९१), राजेश शहा (९४२३१९१३१२), नीलेश गावित (९७६४०३२९०३), जितेंद्र पगारे (९८६०५४५८४७), रवींद्र सोनवणे (९४२००८५२२५), दिनेश सूर्यवंशी (९९६०२४५४३२), चेतना चौधरी (९४२०१६६९१८), धनराज अहिरे (८८८८४४०७२९), कबाडे (७७४५०४२३२६) या शिक्षकांकडे जमा करावेत.

Marathon Competition in Nandurbar on 14 august news
Nandurbar News : बायोडिझेलसदृश इंधनाची खापर परिसरात विक्री; डिझेलपेक्षा 20 ते 25 रुपयांनी स्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com