विद्यार्थ्यांचे संशोधन ..."कोरोना'ला रोखण्यासाठी "थ्रीडी प्रिंटेड मास्क' !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयाने निर्मित केलेले थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क सर्वांना उपयुक्त ठरणार आहे.

जळगाव  : आज संपूर्ण जग "कोविड 19' या गंभीर आजाराशी लढा देत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी नवनवीन संशोधन सुरू आहेत. शहरातील जी. एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "कोरोना'ला रोखण्यासाठी सुरक्षित थ्रीडी प्रिंटेड मास्क तयार केले आहे. उपलब्ध साहित्यातून त्यांनी ही निर्मिती केली आहे. 

क्‍लिक कराः जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 
 

"रायसोनी'च्या यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधान व साहित्यातून प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू तसेच यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख डॉ. नितीश सिन्हा आणि प्रा. दत्ताञय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखराज वाघ, सुशील महाजन, दामोदर जीवराजनी, शुभम सोनवणे आणि शिवम कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी वेळेत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्कृष्ट दर्जाचे "कोविड 19'पासून सुरक्षा देणारे फेस मास्कचे डिझाईन करून निर्मिती केली. एका "थ्रीडी मास्क'ला 70 रुपये इतका खर्च येत असून, "कोविड 19'पासून सुरक्षा देणाऱ्या या फेस मास्कचे डिझाईन CATIA सॉफ्टवेअरमध्ये मानवी चेहरा लक्षात घेऊन करण्यात आले. त्यानंतर याला तंत्रज्ञानाचा उपयोग करून थ्रीडी प्रिंटिंग मशिनला उपयोगी अशा भाषेत रूपांतर करून त्याची यंत्र अभियांत्रिकी विभागाचे उत्कृष्टतेचे केंद्र (Center of Excellence) येथे उच्च तंत्रज्ञानाने थ्रीडी प्रिंटिंग मशिनवर निर्मिती केली. त्यानंतर या फेस मास्कला High Efficiency Particulate Air (HEPA) फिल्टर आणि बांधायला ईलास्टिक लावण्यात आले. 

नक्की वाचा :  डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 

मास्कमध्ये लावण्यात आलेले हेपा फिल्टर हे 99.996 टक्‍क्‍यांपर्यंत 0.3 मायक्रॉन आणि त्या पेक्षा मोठे कण अडवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून समोर आले आहे, की शिकताना 1.0 मायक्रॉन इतक्‍या छोट्या कणांपासून "कोविड 19' होऊ शकतो. त्यामुळे रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयाने निर्मित केलेले थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाचे रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी कौतुक केले आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...कोरोनाग्रस्तांची संख्या एकतीसवर ! 
 

वैशिष्ट्ये 
 मास्कमध्ये सुरक्षित "हेपा फिल्टर' 
 "कोरोना'ला रोखण्यासाठी सुरक्षित 
 हवेला न रोखणारा फेस मास्क 
 श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण न करणारा 
 समोरील व्यक्‍तीने शिंकताना उडणारे लाळेचे कण रोखले जातात 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marati news jalgaon prevent "corona" 3D printed mask to Student research