मेहरुणच्या परिसरात तब्बल 'इतके' सरपटणारे प्राणी 

mehrun lake.jpg
mehrun lake.jpg

जळगाव : मेहरुणचा परिसर झाडी, पक्षी तसेच जीवजंतूनी निसर्गसंपन्न असा असून या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा देखील मोठा अधिवास आहे. तलावाच्या भवती तब्बल २७ प्रकारचे विविध सरपटणारे प्राणी या ठिकाणी असून यात मुख्यत्वे करून साप, सरडे, बेडूक, पालींचा समावेश आहे. 

सापांचा मोठा अधिवास 
मेहरुण तलावाच्या परिसरात गवताळ प्रदेश, जंगल, शेती असल्याने येथे विविध प्रकारचे सापांची देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. यात नाग, घोणस, मणियार असे विषारी सर्प, बिनविषारीत पाण्यात राहणारे पाणदिवड, धामण, कवड्या, गवत्या, कुकरी असे विविध प्रकारचे साप आढळतात. 

दुर्मिळ भारतीय अंडीखावू साप 
तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा अधिवास आहे. त्यामुळे पक्ष्यांनी घातलेले अंडी खाणारा भारतीय अंडीखावू साप देखील मेहरुण तलावाच्या परिसरात आढळतो. हा दुर्मिळ प्रजातीचा साप असून हा खूप कमी ठिकाणी दिसून येतो. या सापाचे मेहरुण तलाव परिसरात अस्तित्व असून अनेक वेळा वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्रांना हा साप दिसून आला आहे. तलावाच्या परिसरात विविध प्रकारचे पाली, बेडूक, सरडा, सापसुरळीच्या विविध प्रजातीही आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com