आयपीएस व्हायचंय, मोठी नोकरी लागल्यावर म्हणत तिने सोडले वसतिगृह !

रईस शेख
Wednesday, 3 March 2021

घरचे मला शिकू देणार नाही, मला आयपीएस व्हायचंय मला मला मोठी नोकरी लागल्यावर मी पून्हा घरी येईल

जळगाव : ‘घरचे मला शिकू देणार नाही. मला आयपीएस व्हायचंय’, मला मोठी नोकरी लागल्यावर मी आता पून्हा येणार असे म्हणत सतरावर्षीय विद्यार्थिनीने कुणाला काहीही न सांगता वसतिगृह सोडल्याची घटना जळगाव येथे घडली. 

आवर्जून वाचा- भारतातील रहस्यमय असा..हाडांचा सांगाड्यांचा रुपकुंड तलाव; संशोधनातून या गोष्टी आल्या समोर
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील १७ वर्षीय विद्यार्थिनी जळगावात शिक्षण घेत आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी ती राहते. तिने नातेवाइकांच्या मोबाईल नंबरवर व्हाइस मॅसेज तयार करून घरचे मला शिकू देणार नाही, मला आयपीएस व्हायचंय मला मला मोठी नोकरी लागल्यावर मी पून्हा घरी येईल असा मॅसेज टाकून टाकला.

आवश्य वाचा- उत्तर भारतातून केळीला मागणी वाढली; आणि भाव पोहचले १,४०० वर 
 

 

रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: messing marathi news jalgaon seventeen year old girl left hostel missing police searched