सत्तेच्या राजकारणात आमदार फरांदेचे पारडे जड 

live
live

नाशिक- शहराचे आमदार म्हणून काम करतं असताना महापालिकेचे राजकारण देखील सांभाळावे लागते. महापालिकेवर ज्याची पकड त्याला राजकारण सोपे जाते असा शहराच्या राजकारणाचा आतापर्यंतचा ईतिहास आहे. भाजपच्या महापालिकेतील सत्तेच्या पहिल्या अडिच वर्षात माजी आमदार बाळासाहेब सानप यांची पकड होती. त्यानंतर आता मध्य विधानसभा मतदारसंघातील सतीश कुलकर्णी व फरांदे समर्थक उपाध्यक्ष सुनिल बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल यांना उपमहापौर पद मिळाल्याने महापालिकेवर आता आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. 

   शहराच्या राजकारणात महापालिकेचा मोठा रोल असतो. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या महापौरांवर आमदारांचा हात असल्याशिवाय राजकारण चालतं नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे. भाजपच्या महापालिकेतील सत्तेच्या पहिल्या टर्म मध्ये महापौर असलेल्या रंजना भानसी माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक होत्या. सानप यांनी महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून पंचवटी विभागाकडे महत्वाची पदे मिळवून दिली होती.

आमदार फरांदेचाही पाठिंबा
 महापालिकेचा कुठलाही निर्णय सानप यांना विचारल्या शिवाय होत नव्हता. त्यामुळे शहरातील तिन्ही आमदारांमध्ये महापालिकेच्या वर्चस्वावरून एकमेकांमध्ये खटके उडतं होते. आता सानप पक्षापासून दुर गेल्याने सत्तेच्या दुसऱ्या टर्म मध्ये सानप राजकारणापासून दुर गेले. नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासाठी जसे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने यांनी फिल्डींग लावली त्याचप्रमाणे आमदार फरांदे व सुहास फरांदे यांनी देखील त्यांच्या नावाला विरोध केला नाही. त्यामुळे महापौर कुलकर्णी हे फरांदे समर्थक असल्यावर शिक्कामोर्तब झाले. 

बागुलांना मिळाला न्याय 
सुनिल बागुल यांना शिवसेनेने जय महाराष्ट्र केल्यानंतर भाजप अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून आमदार फरांदे यांनी सुनिल बागुल यांचे भाजप मध्ये पुर्नवसन केले. बागुल यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने मध्य विधानसभा मतदारसंघात वसंत गिते यांना तोडीस तोड देण्यासाठी बागुल यांचे पुर्नवसन करण्यात आले. बागुल यांना प्रदेश उपाध्यक्ष बनविण्यात आले. आता त्यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल यांना उपमहापौर करण्यात आल्याने त्यादृष्टीने देखील आमदार फरांदे यांचे सत्तेच्या राजकारणातील बळ वाढल्याचे बोलले जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com