कॅनडात नोकरी मिळणार म्हणून 'ते' खूश होते...पण..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

नोकरी आणि कायमस्वरूपी रहिवासाचा व्हिसा करून देण्याचे आमिष दांपत्याला दाखविले होते. त्यासाठी संशयितांनी त्यांच्याकडून मूळ कागदपत्रेही ताब्यात घेतली. त्यानंतर संशयितांनी वाटवाडे यांच्याकडून रोखीत, तर कधी धनादेशाद्वारे पाच लाख ९२ हजार ५०० रुपये घेतले. बऱ्याच कालावधीनंतरही वाटपाडे दांपत्याला कॅनडात नोकरी मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. 

नाशिक : कॅनडात नोकरी आणि कायमस्वरूपी रहिवासाचा व्हिसा देण्याचे आमिष दाखवून तिघा संशयितांनी दांपत्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

दांपत्याकडून कधी रोखीत, तर कधी धनादेशाद्वारे घेतली रक्कम

नितीन वसंत पाटील, माई वसंत पाटील (दोघेही रा. निवास रेसिडेन्सी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक), विजया नितीन सावळे अशी तिघा संशयितांची नावे आहेत. शरद मधुकर वाटपाडे (रा. जनकनगरी, खुटवडनगर, कामटवाडे, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, वाटपाडे दांपत्य उच्चशिक्षित आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये संशयित नितीन पाटील व साथीदारांनी संगनमताने वाटपाडे व त्यांच्या पत्नीला कॅनडा येथे नोकरी आणि कायमस्वरूपी रहिवासाचा व्हिसा करून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी संशयितांनी त्यांच्याकडून मूळ कागदपत्रेही ताब्यात घेतली. त्यानंतर संशयितांनी वाटवाडे यांच्याकडून रोखीत, तर कधी धनादेशाद्वारे पाच लाख 92 हजार 500 रुपये घेतले. बऱ्याच कालावधीनंतरही वाटपाडे दांपत्याला कॅनडात नोकरी मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली.

हेही वाचा > नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल
 

सरकारवाडा पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान, संशयितांनी वाटपाडे दांपत्याला कॅनडातील नोकरीसाठी जाण्यास सांगून व्हिसा, तसेच एफडीसाठी आठ लाखांचा खर्च आल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच, याचदरम्यान, कॅनडात नोकरी मिळेल, यामुळे वाटपाडे दांपत्याने परदेशातील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या संशयित नितीन पाटील यांच्या सल्ल्याने नाकारल्या. त्यामुळे वाटपाडे दांपत्याचे 2015 ते 2019 या काळात एक कोटी 50 लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सरकारवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, नितीन पाटील, माई पाटील व त्यांचे भागीदार विजया सावळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

क्लिक करा >  नाहीतर ५० प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik couple cheated by fraudman Nashik Crime News