नंदुरबार : मनसेतर्फे लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालीसाचे पठन | latest nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे नाका परिसरातील हनुमान मूर्तीसमोर हनुमान चालिसा पठण करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी

मनसेतर्फे लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालीसाचे पठन

नंदुरबार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठन करण्यात आले. यावेळी परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.(Hanuman Chalisa was recited on loudspeakers in Hanuman Temple in dhule naka nandurbar)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम दिला होता. हे भोंगे उतरवले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी ४ मे ला राज्यभर मशिदींपासून हनुमान मंदिरांमध्ये दुप्पट आवाजाने भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणावी, असा आदेश दिला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदिरात सकाळी अकरा वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर लावत हनुमान चालिसा म्हटली.

हेही वाचा: मनसे नेते संदीप देशपांडेंविरोधात गुन्हा दाखल

याप्रसंगी मनसेचे नंदुरबार (Nandurbar) जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, उपशहराध्यक्ष राम ठक्कर, बबन पाडवी, अनिल पेंढारकर, अशोक माळी, उमेश मदने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालिसा म्हणण्यात आली आहे. तसेच यापुढेही सूचनेनुसार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

हेही वाचा: भोंगाप्रकरणी पहिल्याच दिवशी पोलिसांकडून मनसेच्या 234 जणांना नोटीस 58 जण ताब्यात

Web Title: Mns Recites Hanuman Chalisa With Loudspeaker In Nandurbar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj ThackerayNandurbarmns
go to top