Dhule Crime News : लैंगिक अत्याचार प्रकरणी फिर्यादी आईच फितुर

girl harrasment
girl harrasment esakal

Dhule Crime News : मोहाडी उपनगरमधील अल्पवयीन (वय ११) मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद आईने पोलिस ठाण्यात दिली. (mother gave false information in court in daughter abuse case dhule crime)

या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर येथील जिल्हा न्यायालयात कामकाज चालले; परंतु फिर्यादी आई फितुर झाल्याने, तिने खोटी साक्ष दिल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचा, तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत पीडितेला प्रदान झालेली ७५ हजाराची रक्कम वसुलीचा महत्त्वपूर्ण आदेश जिल्हा विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी दिला.

मोहाडी उपनगरमधील ११ वर्षीय मुलगी २ नोव्हेंबर २०२१ ला दुपारी एकला शेळ्या चारण्यासाठी घराबाहेर पडली. त्या वेळी शांताराम शिवराम अहिरे (वय ७१) याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्या मुलीला सायकलवर सावळदे (ता. धुळे) शिवारातील एका शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुझ्यासह आई-वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी वृद्ध अहिरे याने पीडित मुलीला दिली. पीडित मुलगी सायंकाळी सहाला घरी परतली.

मोहाडीत गुन्हा दाखल

घाबरल्यामुळे पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने आईला अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यामुळे तिच्या आईने ८ नोव्हेंबर २०२१ ला रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित शांताराम अहिरे याच्याविरुद्ध पॉक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. संशयिताला पोलिसांनी ९ नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

girl harrasment
Dhule Crime News : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

फिर्यादी आई फितुर

या प्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कामकाज सुरू झाले. वेळोवेळी कामकाजात संशयित अहिरे याचा दोन ते तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला गेला. या खटल्याचे कामकाज अंडर ट्रायल चालविले गेले. तथापि, पीडित मुलगी आणि तिची फिर्यादी आई फितुर झाली. आईने खोटी साक्ष दिल्यामुळे तिच्यावर कारवाईची मागणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जाधव यांनी केली.

न्या. देशमुखांचे निरीक्षण

या पार्श्वभूमीवर निरीक्षण नोंदविताना न्या. श्रीमती देशमुख यांनी म्हटले, की फिर्यादीच्या मुलीसोबत कोणतीही घटना घडली नसती तर तिला पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. पीडित मुलीच्या वैद्यकीय अहवालाने लैंगिक अत्याचार उघड केला. तशी घटना फिर्यादी आईने कथन केला होती.

कोणतीही घटना घडली नसती तर तिला मुलीची वैद्यकीय तपासणी करून लैंगिक अत्याचाराचा इतिहास सांगण्याची गरज नव्हती. फिर्यादी आईने खटल्यास आणि न्यायालयाला खऱ्या निष्कर्षापर्यंत पोचण्यास मदत करायला हवी होती आणि खरी उत्तरे द्यायला हवी होती. तिने दाखल केलेल्या जबाबात काहीही तथ्य नाही. खरी उत्तरे लपवून ठेवण्याचे कामदेखील गुन्हाच आहे.

girl harrasment
Nashik Bribe Crime : 50 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह महिलेला अटक

तिने खरी उत्तरे लपविल्याचे स्पष्ट झाले. ती खोटी उत्तरे देत असल्याने तिच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत आहे. न्यायालयात शपथेवर खोटे पुरावे देणे हा एक धोका बनला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत आहे. न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या साक्षीदारांवर कठोर कारवाई करून या दुष्कृत्याला आळा घालण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिला विनोद कुमारीविरुद्ध मध्य प्रदेश या याचिकेत खोट्या साक्षीची दुष्प्रवृत्ती चिंताजनक असल्याचे मत नोंदविले आहे.

फिर्यादीवर गुन्हा दाखल होणार

असे असताना पीडित मुलगी आणि फिर्यादी आईच्या उलटतपासणीत आरोपीचा अपराध सिद्ध करण्यासाठी काहीही साहित्य रेकॉर्डवर आलेले नाही. यास्तव फिर्यादीने हेतुपुरस्सर न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे न्या. श्रीमती देशमुख यांचे मत झाल्याने त्यांनी संशयित अहिरे याला निर्दोष मुक्त केले. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना फितुर फिर्यादी महिलेवर योग्य तो गुन्हा दाखल करणे, तसेच संबंधित यंत्रणेमार्फत मनोधैर्य योजनेंतर्गत ७५ हजारांचा पीडितेला दिलेला आर्थिक लाभ वसुलीचा आदेश दिला आहे.

girl harrasment
Nashik Bribe Crime : सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी गागरे लाच लुचपतच्या जाळ्यात; 50 हजारांची लाच घेताना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com