

Mayur Thakare Arrested in MPSC Paper Leak Investigation
Esakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी पुन्हा नंदुरबारात दाखल झाले होते. पथकाने अटकेत असलेला 'एमपीएससी'चा सहायक कक्ष अधिकारी गोपाल मराठे याच्या घराची झडती घेतली व या प्रकरणातील संशयित ऋतुजा पाटील हिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यानंतर मयूर ठाकरेलासुद्धा अटक करण्यात आलीय.