धुळे महापालिका मालमत्ताकर थकबाकी वसुली मोहिम आजपासून राबविणार

धुळे महापालिका मालमत्ताकर थकबाकी वसुली मोहिम आजपासून राबविणार

धुळे : मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आज पासून मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत थकबाकी वसुली करणे व थकबाकीदार कर भरत नसल्यास जप्ती, नळजोडणी खंडीत करणे व अनुषंगिक कारवाई होणार आहे. मालमत्ता कर थकबाकीची आकडेवारी पाहिली तर थकबाकीदारांकडे महापालिकेचे थोडे थोडके नव्हे तर तब्बल सुमारे ४९ कोटी रुपये घेणे आहे. थकबाकीसह चालू मागणीचा विचार केला तर मालमत्ताधारकांकडे सुमारे ६० कोटी रुपये घेणे आहे. 

शहरातील मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी दर वर्षी मोठी थकबाकी राहते. या थकबाकी वसुलीसाठी दर वर्षी महापालिकेकडून प्रयत्न होतात. थकबाकीवरील शास्ती (दंड) त सूट देण्यासाठी अभय योजनाही राबविली जाते. या योजनेतून शास्तीत १०० टक्के सुटही दिल्याने योजनेचा अनेक थकबाकीदार लाभही घेतात. महापालिकेच्या तिजोरीत भर पडून थकबाकीचा आकडाही कमी होतो. असे असले तरी थकबाकीचा आकडा आजही डोळे फाडणाराच आहे. शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांकडे आजही महापालिकेची मोठी थकबाकी आहे. वर्षानुवर्ष कर अदा न केल्याने ही थकबाकी वाढत गेली. यातून दरवर्षी थोडीफार वसुली होत असली तरी शंभर टक्के वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा दर वर्षी मोठा दिसतो. या वर्षीच्या आकडेवारीकडे पाहिले तर तब्बल ४८ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी आहेत. 

थकबाकीपेक्षा शास्ती मोठी 
मालमत्ताकर थकबाकीदारांना एकूण रकमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. परिणामी थकबाकी वसूल झाली नाही, तर दंडाची रक्कम दर वर्षी वाढते. यामुळेच थकबाकीदारांकडे मूळ थकबाकीपेक्षा शास्ती (दंड) ची रक्कम मोठी आहे. निव्वळ शास्तीचा विचार केला तर थकबाकीदारांकडे आजही तब्बल २४ कोटी ६४ लाख ६३ हजार ५६६ रुपये शास्तीचा बोजा आहे. विशेष म्हणजे अभय योजनांमधून महापालिकेने आत्तापर्यंत तीन कोटी ३९ लाख ५० हजार ६३९ रुपये शास्ती माफ केली आहे. 

चालू मागणीचीही डोकेदुखी 
२०२०-२१ या आर्थिक वर्षात थकबाकीबरोबच चालू मागणीच्या वसुलीचेही महापालिकेपुढे आव्हान आहे. यंदा कोरोनाच्या संकटाने नागरिकांचेही आर्थिक कंबरडे मोडल्याने यात कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूण २३ कोटी ८५ लाख रुपये चालू मागणीपैकी आत्तापर्यंत १२ कोटी ९० लाख रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे अजूनही दाह कोटी ९५ लाख ६९ हजार ८५५ रुपये वसुली बाकी आहे. 


मागणी- वसुलीची स्थिती अशी 
...मागणी... 

- थकबाकी........२९,९५,८०,७६९ 
- चालू...............२३,८५,९१,८०९ 
- शास्ती............२८,३६,५६,४६६ 
- एकूण..............८२,१८,२९,०४४ रुपये 


...वसुली... 
- थकबाकी............५,९६,७७,४४२ 
- चालू.................१२,९०,२१,९५४ 
- शास्ती................३,७१,९२,९०० 
- सूट.....................३,३९,५०,६३९ 
- एकूण................२२,५८,९२,२९५ रुपये 
- एकूण वसुली...................२७.४९ टक्के 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com