Dhule News : महापालिकेतर्फे ‘सुंदर माझा दवाखाना’ अभियानास प्रारंभ

Doctors and staff during the cleaning at Bapat Hospital of the Municipality as part of the campaign.
Doctors and staff during the cleaning at Bapat Hospital of the Municipality as part of the campaign. esakal

Dhule News : जागतिक आरोग्य दिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. ७) शहरातील महापालिका दवाखान्यांत ‘सुंदर माझा दवाखाना’ अभियान राबविण्यात आले. (Municipal Corporation conducted Sundar Maja Dawakhana campaign in municipal clinics dhule news)

पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभियानाचे उद्‍घाटन झाले. दरम्यान, अभियानांतर्गत महापालिकेच्या शहरातील सर्वच दवाखान्यांत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दवाखान्यांसह परिसरात साफसफाई केली.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये ७ ते १४ एप्रिलदरम्यान सुंदर माझा दवाखाना अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. ७) अभियानास प्रारंभ झाला. धुळे महापालिकेतर्फे सायंकाळी साडेपाचला महापालिकेच्या शहरातील नंदी रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अभियानाचे उद्‍घाटन झाले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, नगरसेवक अमीन पटेल, वसीम बारी, मुख्तार बिल्डर, उपायुक्त विजय सनेर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मराठे, डॉ. सिद्धार्थ पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. सलमान कुरेशी, डॉ. सचिन धनराळे, कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक साईनाथ वाघ व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Doctors and staff during the cleaning at Bapat Hospital of the Municipality as part of the campaign.
Nandurbar News : कच्च्या पपईतून अनेकांना रोजगार; चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पशुपालकांची गर्दी

दरम्यान, अभियानांतर्गत दवाखान्यात साफसफाई करण्यात आली. तसेच महापालिकेच्या जुन्या इमारतीमधील बापट दवाखान्यातही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली. इतर दवाखान्यांमध्येही तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साफसफाई करून अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सुरवात केली.

अभियानांतर्गत आठवडाभर दवाखान्यात साफसफाई, परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य सुविधेची गरज असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी यावे यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यात श्रमदानातून आरोग्य संस्थांमध्ये साफसफाई, शक्य असल्यास दवाखान्यांची रंगरंगोटी करणे अपेक्षित आहे. यासाठी सीएसआर फंड, एनजीओंची मदतही घेता येणार आहे.

Doctors and staff during the cleaning at Bapat Hospital of the Municipality as part of the campaign.
Dhule Market Committee Election : भाजप-भदाणे गटात वाटाघाटी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com