Nandurbar Crime News : देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसह 17 आरोपींना 10 वर्ष कारावासाची शिक्षा

Nandurbar Crime : शहादा येथे भाजी मंडईच्यामागे एका घरात काही व्यक्ती, महिला व अल्पवयीन मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवून घेत असताना पोलिसांनी अटक केली होती.
Crime
Crimeesakal

Nandurbar Crime News : शहादा येथे भाजी मंडईच्यामागे एका घरात काही व्यक्ती, महिला व अल्पवयीन मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवून घेत असताना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी महिलांसह १७ जणांवर गुन्हे दाखल करून खटला न्यायालयात सुरू होता. या खटल्याच्या अंतिम सुनावणीत सत्र न्यायालयाने १७ आरोपींना १० वर्षे कारावास व १ लाख १९ हजाराचा रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Nandurbar 17 accused including women engaged in prostitution business sentenced to 10 years imprisonment)

पुणे येथील रेस्क्यू फाउंडेशन यांनी शहादा पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस अधीक्षक, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी व शहादा पोलिस निरीक्षक, महिला अधिकारी, यांनी घरात छापा टाकून २ महिला व पिडीतेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर शहादा पोलिस ठाण्यात स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासी अधिकारी श्री.बुधवंत यांनी गुन्ह्याचा तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले. त्यामध्ये अल्पवयीन मुली व पीडित महिला यांना राजस्थान, काठमांडू (नेपाळ), ओरिसा, पश्‍चिम बंगाल, येथून घरगुती कामाचे जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून वेशा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय यांनी अधिकचे तपासकामी एसआयटी स्थापन करून तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. श्री. वाघुंडे यांनी तपासी अधिकारी म्हणून सखोल तपास केला व गुन्ह्यातील संशयित महिला व पुरुष संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले होते.

Crime
Solapur Crime News : तिघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; अंगावर पाणी पडल्याने एसटी चालकाला मारहाणीचे प्रकरण

खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, आर.जी. मलशेट्टी, यांच्यासमोर झाली. खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात सर्वांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. यानंतर गुन्हयातील १७ आरोपींना पिटा कायदयान्वये दोषी ठरवत प्रत्येकी १० वर्ष कारावास व एक लाख १९ हजारांचा दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

सरकारी पक्षाच्यावतीने माजी सरकारी वकील सुशील पंडित व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व्ही. सी. चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक अर्जुन पटले, पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, अंमलदार नितीन साबळे, गिरीश पाटील यांनी कामकाज पाहिले.

Crime
Jharkhand Crime : ऑर्केस्ट्रा कलाकारावर झारखंडमध्ये बलात्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com