Nandurbar Lok Sabha Constituency : अर्ज खरेदीतून ‘अस्तित्वा’चा आरसा जरा जास्तच चकाकणार

Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभेच्या एका जागेसाठी आजअखेर तीन दिवसांत ५५ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत.
Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituencyesakal

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभेच्या एका जागेसाठी आजअखेर तीन दिवसांत ५५ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. खरी चुरशीची लढत मात्र भाजपच्या डॉ. हीना गावित व काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यातच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आतापर्यंत २३ उमेदवारांनी ५५ अर्ज खरेदी केल्याने चर्चा रंगू लागली आहे. ()

या अर्ज खरेदीतून आपले महत्त्व वाढविण्याचा खटाटोप असल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आलेले आहे. यंदाही तोच प्रकार आहे, फक्त संख्या जास्त असेल, एवढे मात्र निश्चित. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एका जागेसाठी खरी लढत काँग्रेस व भाजपमध्येच चुरशीच्या होत आल्या आहेत. त्यापैकीच कोणीतरी विजयी होणार, हे निश्‍चित आहे. प्रत्येक निवडणुकीला किमान पाच ते सात उमेदवार रिंगणात उतरल्याची परंपरा आहे. मात्र या वेळेस चित्र वेगळे दिसत आहे.

काही पक्षांकडून उमेदवार दिले जाणार आहेत, तर काही हवसे-नवशेही उमेदवारी करण्याच्या विचारात आहेत. त्यात अनेकांनी अर्ज घेऊन ठेवले आहेत. काही उमेदवारांनी जेथे आपल्या मतदान कमी मिळेल तेथे एखादा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून विरोधी उमेदवाराचे मते कमी करण्याची रणनीती असते. म्हणून काही जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. असे असले तरी नेहमीपेक्षा जास्त उमेदवार या निवडणुकीत असू शकतील, हे तेवढेच खरे आहे. त्यामुळे २५ एप्रिलपर्यंत उमेदवारांची संख्याही स्पष्ट होईल.(latest marathi news)

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituency : कॉंग्रेस -भाजपमध्येच 45 वर्षापासून रंगतेय सरळ लढत

नाईक कुटुंबानेही घेतले अर्ज

नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक व त्यांचा पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक यांनीही अर्ज घेतले. निवडणुकीचा सुरवातीस उमेदवारांच्या यादीत रजनी नाईक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र नंतर ते मागे पडले होते. त्यांनी अर्ज घेतल्याने पुन्हा काँग्रेसचे उमेदवार बदलतात की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

मात्र ॲड. गोवाल पाडवी यांची अधिकृत काँग्रेसचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाले आहे. त्यांनी प्रचाराला वेगही दिला आहे. त्यामुळे नाईक कुटुंबातील उमेदवारीची शक्यता मावळली आहे. जाणकारांचा मते राजकीय गुगली असू शकते किंवा उमेदवारी अर्जात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पर्यायी सक्षम उमेदवार असावा, म्हणूनही त्यांनी अर्ज घेऊन ठेवला असावा, असे बोलले जात आहे.

Nandurbar Lok Sabha Constituency
Nandurbar Lok Sabha Constituency : तापीकाठावरील दोन्ही ‘दादा’ सध्या ‘न्यूट्रल’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com