Nandurbar Congress News : एकेकाळच्या जिल्ह्यातील नंबर वन पक्षाची पीछेहाट; जिल्हाध्यक्षाविना चालतोय काँग्रेसचा गाडा

Congress
Congressesakal

Nandurbar Congress News : नंदुरबार जिल्हा काँग्रेसला नक्की नेतृत्वच नसल्याचे चित्र सध्या आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याला साधा जिल्हाध्यक्षही नियमितपणे नियुक्त झालेला नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचा गाडा साधारण पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्षांविनाच सुरू आहे.

त्यामुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेल काय, असा प्रश्‍न काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.(Nandurbar district has not appointed District President on regular basis congress news)

नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता असा पाच वर्षांपूर्वीचा एक काळ होता. कारण त्या वेळी जिल्ह्याला सक्षम असे नेतृत्व चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून मिळाले होते. नंदुरबार आदिवासीबहुल जिल्हा असल्याने सर्वच ठिकाणी राजकीय आरक्षण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर समाजालाही पक्षात कुठेतरी स्थान मिळावे, याचा सारासार विचार करून तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी इतर समाजाला जिल्हाध्यक्षपद दिले होते.

ते अनेक वर्षे रघुवंशी कुटुंबाकडेच होते. त्या पदाला या कुटुंबाने खरोखरच न्याय दिला होता. काँग्रेसवरील निष्ठा त्यांनी राखत पक्षसंघटन केले होते. मात्र पाच वर्षांपूर्वी माजी आमदार तथा तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. तेव्हापासून काँग्रेसला आजतागायत जिल्हाध्यक्षच मिळाला नाही असे चित्र आहे. अनेकदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी वरिष्ठांकडे जिल्हाध्यक्ष नियुक्तीची मागणी केली.

त्याकडे जणू काय आजतागायत दुर्लक्षच झाले आहे. प्रभारी नेतृत्व दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून माजी मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक हे काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. मात्र शेवटी ते काँग्रेसचे पाईक म्हणून नेतृत्व करीत आहेत.

शेवटी जिल्हाध्यक्ष तर जिल्हाध्यक्षच असतो, पक्षाच्या संघटनापासून तर कार्यकर्ते-पदाधिकारी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न असो की पक्षसंघटनाची धुरा ते सांभाळत असतात. सध्या आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडे जरी प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची धुरा असली तरी ते त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नियमित जिल्हाध्यक्ष नियुक्त झाल्यास त्याचा पक्षसंघटनाला नक्कीच लाभ होईल.

Congress
Nandurbar Dengue News : नंदुरबार शहरात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ; नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

जिल्हाध्यक्षपदाचा पूर्वीप्रमाणेच फॉर्म्युला असावा

काँग्रेसकडून जर का जिल्हाध्यक्षांची नियुक्त केली जात असेल तर पूर्वीप्रमाणेच फॉर्म्युला ठेवल्यास तो पक्षसंघटनासाठी नक्कीच फायदेशीर असेल, यात शंका नाही. कारण जिल्ह्यातील राजकारणात आरक्षणामुळे इतर समाजाला कुठेही स्थान नाही. त्यामुळे इतर समाजाकडे सक्षम नेतृत्व हेरून जिल्हाध्यक्षपद दिले गेल्यास नक्कीच काँग्रेसला त्याचा लाभ होईल, अशा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत.

अंतर्गत राजकारणाचा फटका

पक्षाचे दोन आमदार जिल्ह्यात असले तरी जिल्हाध्यक्षच्या रूपाने सक्षम नेतृत्वाची गरज आहे. कारण पक्षांतर्गत राजकारण डोके वर काढू लागले आहे. त्यातून ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये गटातटाचे राजकारण दिसून येत आहे. पक्षाची बांधणी, संघटनापेक्षा गटातटाचे राजकारणच अधिक दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेवर सत्ता असताना हातची सत्ता जाण्याची वेळ काँग्रेसवर आली. त्याला अंतर्गत धुसफूसच नडली आहे. काँग्रेसचे सदस्य फुटून भाजपच्या गोटात जाऊन बसले. ही फूट पक्षासाठी नुकसानकारकच ठरली आहे. फुटलेले सदस्य सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. दुसरीकडे आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, हेही चित्र आहे. त्यामुळे नेमके काँग्रेसमध्ये चालले तरी काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

Congress
Nandurbar Agriculture News : पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळावा; शेतकऱ्यांची अपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com