Nandurbar Summer Heat Stroke : बोरद आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना

Nandurbar News : गावांमध्ये उन्हाचा प्रभाव जास्त जाणवत असल्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे नागरिकांना करण्यात आले.
Arogyavardhini Kendra Building.
Arogyavardhini Kendra Building.esakal

बोरद : सध्या बोरद परिसरात, तसेच परिसरातील इतर गावांमध्ये उन्हाचा प्रभाव जास्त जाणवत असल्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे नागरिकांना करण्यात आले. एप्रिलचे दहा दिवस लोटले असल्याने राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे, तर काही ठिकाणी उन्हाचा तीव्र तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. (Nandurbar Establishment of heat stroke ward at Board Arogyavardhini Centre)

गेल्या दोन दिवसांपासून बोरद परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे घामाच्या धाराही निघू लागल्या आहेत. वातावरणात काहीसा दमट प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

बाहेर निघताना नागरिकांनी उन्हाच्या वेळेस बाहेर निघू नये, तसेच बाहेर निघाला असाल तर डोक्यावर काहीतरी असावे, निदान एक टोपी किंवा रुमाल तरी बांधलेला असावा व संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे असावेत, तसेच जास्त वेळ उन्हात थांबू नये, जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही किंवा उन्हाच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होईल.

कोणाला काही त्रास उद्‍भवल्यास तसेच उलटी व हलकासा ताप जाणवू लागल्यास त्यांनी लागलीच केंद्राशी संपर्क साधावा, तसेच प्रत्येकाने भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील पाण्याचा योग्य तो समतोल राखता येईल व अधिक त्रास जाणवल्यास योग्य ते उपचार करून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला उष्णतेपासून वाचविता येईल. (latest marathi news)

Arogyavardhini Kendra Building.
Nandurbar News : जन्म पुराव्याअभावी आधारकार्ड अपडेट कामात अडचण

"लहान मुलांच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांचा सध्या परीक्षा कालावधी सुरू आहे अशा परिस्थितीत शाळेव्यतिरिक्त त्यांना सायंकाळऐवजी दुपारी बाहेर निघू देऊ नये असे केले तर आपली मुले उन्हापासून संरक्षित राहतील.सध्या बोरद परिसरात उन्हाचा तीव्र प्रभाव जाणवत असल्याने बोरद आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामध्ये सध्या असलेल्या खाटांपैकी दोन खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत, जेणेकरून परिसरातील कोणीही नागरिक उष्माघाताने प्रभावित झाला असेल तर त्याचा योग्य तो इलाज या ठिकाणी आम्हाला करता येईल. त्यामुळे नागरिकांनी त्रास उद्‍भवल्यास लागलीच या ठिकाणी येऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा." -डॉ. अरुण लांडगे, वैद्यकीय अधिकारी (आरोग्यवर्धिनी केंद्र),

Arogyavardhini Kendra Building.
Nandurbar Irrigation Project : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत अत्यल्प साठा; 4 प्रकल्पांमध्ये ठणठणाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com