Nandurbar News: शेतमालाचे भाव स्वस्त अन् शासन निवडणूक कामात व्यस्त! गहू, हरभरा, सोयाबीन व कापूस दरातील घसरणीने शेतकरी हवालदिल

Nandurbar News : सध्या रब्बीतील पीक काढणी सुरू असल्याने किमान रब्बी पिकांना तरी समाधानकारक भाव मिळेल या आशेने शेतकरी मोठ्या उमेदीने काढणी कामात व्यस्त आहेत.
Politician & Tensed Farmer
Politician & Tensed Farmeresakal

कळंबू : सध्या रब्बीतील पीक काढणी सुरू असल्याने किमान रब्बी पिकांना तरी समाधानकारक भाव मिळेल या आशेने शेतकरी मोठ्या उमेदीने काढणी कामात व्यस्त आहेत. मात्र गहू, हरभरा, सोयाबीन पीक मार्केटला जाईपर्यंत मोठी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. म्हणून शेतमालाचे भाव स्वस्त अन् शासन निवडणूक कामात व्यस्त असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Nandurbar loksabha elections prices of agricultural products fall marathi news)

रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका, सोयाबीन, पिकाला समाधानकारक भाव नसल्याने, खानदेशात जास्त प्रमाणात कापूस लागवड केली जाते. मात्र गेल्या वर्षी व चालू वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी साठवून ठेवलेला कापूस मिळेल त्या दरात विकला.

हातात असलेला माल गेल्यावर आता सद्यःस्थितीत कापसाचे दर काही प्रमाणात वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिसून येत आहे. मात्र या वर्षी निवडणुका असल्याने शेतमालाचे भाव समाधानकारक असतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. (latest marathi news)

Politician & Tensed Farmer
Nashik Agricultural Success: दुष्काळाशी 2 हात करीत फुलवली डाळिंबाची बाग! जळकू येथील शिंदे बंधुंचा प्रयोग यशस्वी

मात्र कापसाच्या उत्पादनात तफावत, त्यात भावपण असमाधानकारक त्यामुळे पदरी निराशा येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या व चालू वर्षी सुरवातीला गहू, हरभरा पिकाला चांगला दर होता. मात्र आवक वाढल्याने हरभरा, गहू पिकाच्या दरात मोठी घसरण होत असल्याने, शेतकऱ्यांचे दर वर्षी अर्थचक्र बदलत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार कापूस सुरवातीलाच विकला. ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे त्यांना कापसाच्या वजनात मोठी घट सोसावी लागणार आहे. त्यामुळे कापूस विकून पण भुर्दंड व साठवणूक करूनही भुर्दंड अशा परिस्थितीचा सामना शेतकरी करीत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावरसुद्धा शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य शेतकरी वर्ग करीत आहे.

Politician & Tensed Farmer
Nashik Agricultural Success: परदेशवाडीतील पती-पत्नीने फुलवली नैसर्गिक मिश्रशेती! झाडे दांपत्यांचा यशस्वी प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com