Nandurbar News : 10 हजार महिला सदस्यांना अर्थसहाय्य निवड प्रमाणपत्रवाटप : खासदार डॉ. हीना गावित

Nandurbar : नवापूर तालुक्यातील एक हजार ५६ बचतगटांच्या सुमारे १० हजार महिला सदस्यांना अर्थसहाय्य निवड प्रमाणपत्रवाटप करण्यात आले.
MP Dr. Heena Gavit
MP Dr. Heena Gavit esakal

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिला आत्मनिर्भर बनाव्यात, त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरू करावेत यासाठी राज्य सरकारकडे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि केंद्र सरकारकडे आपण सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

त्यातूनच अनुसूचित जमातीच्या बचतगटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचतगटांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य प्राप्त होत असून, नवापूर तालुक्यातील एक हजार ५६ बचतगटांच्या सुमारे १० हजार महिला सदस्यांना अर्थसहाय्य निवड प्रमाणपत्रवाटप करण्यात आले. (Nandurbar MP Dr Heena Gavit Distribution of financial assistance selection certificate to 10 thousand women members)

विविध योजनांचे लाभ देण्यातील हासुद्धा एक विक्रम आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. हीना गावित यांनी केले. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या बचतगटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचतगटांना अर्थसहाय्य निवडपत्रवाटपाचा बचतगटाचा महामेळावा नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे झाला.

त्याप्रसंगी खासदार डॉ. गावित बोलत होत्या. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार शरद गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या वाटपप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्षा सविता जयस्वाल, बकाराम गावित, नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल माळी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात जवळपास सहा हजार महिला उपस्थित होत्या. खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की मी महिला खासदार असल्याने महिलांच्या समस्या सोडविण्यावर आणि त्या संबंधित योजना गावागावापर्यंत पोचविण्यावर आपला भर असतो. जलमिशन योजनेंतर्गत आगामी तीस वर्षांच्या पाणी नियोजनाची सोय करून देत असून, आतापर्यंत अनेक गावांना जलकुंभ उभारून हर घर नल योजनेतून पाणी पुरविण्याचे काम प्रगतिपथावर आणले आहे.(latest marathi news)

MP Dr. Heena Gavit
Nandurbar News : तळोद्यात ऐन उन्हाळ्यातील हालामुळे नागरिकांची नाराजी

बचतगटांना केंद्रीय विशेष अर्थसहाय्यातून प्रक्रिया प्रकल्प आणि छोटे उद्योग सुरू करायला मदत केली आहे. शेतीला पूरक उद्योग करता यावा म्हणून गाय, शेळीवाटप सुरू आहे. आता लवकरच केंद्राकडून शेती करणाऱ्या महिलांना ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच त्यासाठीचे साधन साहित्य पुरविले जाणार आहे, अशीही माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षण, कृषी तसेच महिलाविषयक योजनांची माहिती दिली. महिलांनी योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले.

माजी आमदार शरद गावित यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात झालेल्या विकासाची माहिती दिली, तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे लाभ देणाऱ्या योजना व विकास प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.

MP Dr. Heena Gavit
Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे नंदुरबारात रूट मार्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com