Nandurbar News : नवापूर बस आगारातील बसेसची दुरावस्था; प्रवाशांच्या जिवाशी खेळ, आवाजाने प्रवासी बेजार

Bad condition of buses in Nawapur Bus Depot
Bad condition of buses in Nawapur Bus Depotesakal

नवापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या नवापूर आगारातील बसची दुरवस्था पाहून मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. कोरोनाकाळानंतर बसफेऱ्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र बहुतेक बस मोडकळीस आल्या आहेत.

त्यांचे किलोमीटर संपूनही त्या रस्त्यावर धावत आहेत. काही बस शेवटच्या घटका मोजत असताना त्यांना लांब पल्ल्यावर धावावे लागत आहे. बसचे स्पेअरपार्ट ढिले झाल्याने व खिडक्यांचे रबर तुटल्याने प्रचंड कर्कश आवाजाने प्रवाशांचे डोके दुखल्याशिवाय राहत नाही.

महामंडळाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज आहे. फक्त सुरक्षा पंधरवडा व इंधन बचत माह अभियान राबवून उपयोग नाही. मूळ समस्या सोडविणे गरजेचे आहे. (Nandurbar News Bad condition of buses in Navapur Bus Depot Playing with lives of passengers noise makes passengers sick Nandurbar News)

Bad condition of buses in Nawapur Bus Depot
Akola Latest News : वाळू घाटांच्या ई-लिलावासाठी परवानगीची प्रतीक्षा

नवापूर आगारातील बसची स्थिती फारशी बरी नाही. नवापूर आगारात सध्या ६१ बस आहेत. यांपैकी कीती चांगल्या स्थितीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. पुणे, नाशिक, जळगाव, भुसावळ, मालेगाव, अहमदाबाद, बडोदा, सुरत, धुळे, चोपडा यासह लांब पल्ल्याच्या गाड्या चांगल्या स्थितीत असल्या पाहिजेत.

या गाड्यांच्या खिडक्या व इतर पार्ट मोडकळीस आल्याने प्रचंड आवाज होतो. त्यामुळे प्रवाशांचे डोके दुखल्याशिवाय राहत नाही. काही बसचा दरवाजा बंद होत नाही. या गाड्या ग्रामीण फेऱ्या करण्यासाठीदेखील उपयुक्त नाहीत. नवापूर आगारात नवीन बसची आवश्यकता आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Bad condition of buses in Nawapur Bus Depot
Nashik Agriculture Update : लासलगावसह परिसरात दाट धुक्याची चादर; दवबिंदूमुळे द्राक्षांना बसणार फटका

वाहक आणि चालक यांना बसची दुरवस्था ज्ञात असूनही प्रवाशांना घेऊन बस मार्गस्थ होत आहेत. या गाड्यांबाबत वाहक, चालक किंवा आगारप्रमुख कधीही नकारात्मक बोलत नाहीत. मात्र बसची अवस्था पाहताच लक्षात येते.

नव्या गाड्या देत नसाल तर आहेत त्या गाड्यांचे ढिले झालेले पार्ट व्यवस्थित फिट केले पाहिजेत, खिडक्यांना रबरी पॅकिंग टाकून त्यांचा आवाज तरी बंद करावा.

या दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र बसची अवस्था बघता परिवहन महामंडळ प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे. वेळकाढू धोरण अवलंबत आहे असे वाटते. नवापूर आगारातील ६१ बसपैकी बहुतांश रस्त्यावर धावण्याच्या परिस्थितीत नाहीत.

महामंडळाने प्रवाशांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. नवापूर आगारात सद्यःस्थितीत ६१ बस असून, रोज २५२ फेऱ्या होतात. यातून रोज सरासरी साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळते. या आगारात १२७ चालक, तर १०२ वाहक आहेत.

Bad condition of buses in Nawapur Bus Depot
Jalgaon Crime News : गाडीला लागलेला ठोसा पाहणे पडले महागात; रोकड, दागिन्यांसह साडेचार लाख लंपास

"नवापूर आगारात ६१ बस असून, सर्व बस चांगल्या स्थितीत आहेत. सर्व बस मार्गस्थ होण्याआधी मेंटेनन्स केला जातो. नवीन बसची मागणी केली आहे. धुळे विभागीय कार्यालयात कार्यवाही सुरू आहे. बसबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही."

-राजेंद्र अहिरे, आगारप्रमुख, नवापूर

Bad condition of buses in Nawapur Bus Depot
Jalgaon News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com