Nandurbar News : शहादा येथे कचरा संकलनासाठी क्यूआर कोड

Nandurbar : पालिका प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयटीसी प्रणाली कार्यान्वित केली असून, प्रत्येक मालमत्तेवर, मुख्य रस्त्यांवर विशिष्ट क्यूआर कोड बसविला जाणार आहे.
QR code for garbage collection
QR code for garbage collection esakal

Nandurbar News : कचरा संकलन ठेकेदाराने नियमानुसार काम करावे यासाठी राज्य शासनाच्या आदेशान्वये पालिका प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयटीसी प्रणाली कार्यान्वित केली असून, प्रत्येक मालमत्तेवर, मुख्य रस्त्यांवर विशिष्ट क्यूआर कोड बसविला जाणार आहे. यामुळे ठेकेदाराच्या कारभाराला आळा बसेल, तसेच नियमित कचरा संकलन होण्यास मदत होणार असून, दररोजचा डाटा पालिका प्रशासनासह राज्य शासनाला तत्काळ उपलब्ध होणार आहे. (Nandurbar QR code for garbage collection at Shahada)

शहरातील मालमत्ताधारकांकडून दैनंदिन कचऱ्याच्या संकलनासाठी पालिका प्रशासनाने सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चाचा वार्षिक ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. शहरातील अनेक वसाहतींमध्ये आठवड्यातून केवळ दोन दिवसच घंटागाडी येत आहे. तसेच रस्त्यांची नियमित सफाई होत नसल्याने पालिका प्रशासन व नागरिकांमध्ये अनेक वेळा वाद होत होते.

पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत पालिका प्रशासनाला वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून खासगी ठेकेदारांना दररोज कचरा संकलनाचे काम दिले होते. घंटागाड्यांच्या माध्यमातून हे कचरा संकलन करून त्याचे कचरा डेपोपर्यंत विल्हेवाट लावण्याचे काम ठेकेदाराचे होते.

मात्र, अनेक वसाहतींमध्ये केवळ आठवड्यातून दोन दिवस, तर काही वसाहतींमध्ये एक दिवस घंटागाडी येत असल्याने दररोजचे कचरा संकलन योग्य प्रकारे होत नव्हते. यामुळे पालिका प्रशासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असली तरी ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याने पालिकेचा हा खर्च बहुतांशी वायफळ ठरत होता. नियमित कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिकांमध्येही पालिका प्रशासनाबद्दल रोष होता. (latest marathi news)

QR code for garbage collection
Nandurbar News: शेतमालाचे भाव स्वस्त अन् शासन निवडणूक कामात व्यस्त! गहू, हरभरा, सोयाबीन व कापूस दरातील घसरणीने शेतकरी हवालदिल

ठेकेदाराने नियमानुसार काम करावे व नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी पालिका प्रशासनाने अद्ययावत आयटीसी प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील प्रत्येक मालमत्तेवर व कचरा संकलन करणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट प्रकारचा क्यूआर कोड लावण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक नागरिकाला घरासमोर क्यूआर कोड लावणे बंधनकारक केले आहे.

साडेसात हजारांवर क्यूआर कोड

आयटीसी या खासगी कंपनीला क्यूआर कोड लावण्याचा ठेका दिला आहे. शहरात ५ मार्चपासून क्यूआर कोड लावले जात असून, एकूण ११ हजार ९३० पैकी २० मार्चअखेर सात हजार ४०० मालमत्तांवर क्यूआर कोड लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.

QR code for garbage collection
Nandurbar Lok Sabha Election : गावितांच्या कन्येविरोधात पाडवींच्या पुत्राचे नाव चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com