Nandurbar News : नंदुरबार-तळोदा रस्त्यावर धावत्या बसने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

Nandurbar : अक्कलकुव्याकडे प्रवासी घेऊन जात असताना नंदुरबार शहराबाहेरील तळोदा रस्त्यावर धावत्या बसने पेट घेतला.
Bus caught fire suddenly on Nandurbar-Taloda road. Citizens and driver extinguishing fire in bus.
Bus caught fire suddenly on Nandurbar-Taloda road. Citizens and driver extinguishing fire in bus.esakal

Nandurbar News : नाशिक-अक्कलकुवा एसटी बस बुधवारी (ता. १३) दुपारी सव्वाअकराच्या सुमारास अक्कलकुव्याकडे प्रवासी घेऊन जात असताना नंदुरबार शहराबाहेरील तळोदा रस्त्यावर धावत्या बसने पेट घेतला. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून तत्काळ प्रवाशांना खाली उतरविले.

या घटनेमुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. प्रवासी भयभीत झाले होते. मात्र घटना योगेश्‍वरी मंदिराजवळ घडल्याने मंदिराजवळील नळावरून पाणी तत्काळ मारण्यात आल्याने पुढील धोका टळला. (Nandurbar running bus caught fire on Nandurbar Taloda road)

अक्कलकुवा आगाराची नाशिकहून अक्कलकुव्याकडे जाणारी एसटी बस (एमएच १४, बीटी २७०३) बुधवारी दुपारी सव्वाअकराच्या सुमारास प्रवासी घेऊन नंदुरबार आगारातून निघाली. त्यानंतर तळोदा रस्त्यालगत गाडी धावत असताना योगेश्‍वरी मंदिराजवळ अचानक पेट घेतला. ही घटना चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबविली.

तशा घाबरलेल्या अवस्थेतच त्यांनी चालकाला सांगून प्रवाशांना तत्काळ सामान घेऊन उतरविण्याचे आवाहन केले. आगीने चालक केबिनमध्ये पेट घेतला होता. त्यामुळे प्रवाशांनी त्वरित खाली उतरण्यास सुरवात केली. (latest marathi news)

Bus caught fire suddenly on Nandurbar-Taloda road. Citizens and driver extinguishing fire in bus.
Nandurbar News : तळोद्यात ऐन उन्हाळ्यातील हालामुळे नागरिकांची नाराजी

सुमारे ३२ प्रवासी बसमध्ये होते. ते नाशिकहून अक्कलकुव्याकडे जाणारे होते. त्यातील काही येणारे-जाणारे वाहनधारक तेथे थांबले.

प्रवासी व चालक-वाहक यांनी लगत असलेल्या मंदिराजवळील नळाची नळी लावून बसवर पाणी मारले. लगत पडलेली वाळू आग विझविण्यासाठी टाकली. त्यामुळे आग आटोक्यात आली. पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम, यंत्र अभियंता पंकज महाजन व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोचले. तपासणीत यांत्रिक शार्टसर्किटमुळे ही घटना झाल्याचे सांगण्यात आले.

Bus caught fire suddenly on Nandurbar-Taloda road. Citizens and driver extinguishing fire in bus.
Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे नंदुरबारात रूट मार्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com