esakal | नाशिक जिल्ह्यात १० दिवसांनंतर शंभरहून अधिक बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नाशिक जिल्ह्यात १० दिवसांनंतर शंभरहून अधिक बाधित

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या संथ गतीने वाढत आहे. दहा दिवसांनंतर जिल्‍ह्यात दैनंदिन आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या शंभराहून अधिक राहिली. बुधवारी (ता. १) जिल्‍ह्यात १०२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ७० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तीन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यापूर्वी २१ ऑगस्‍टला ११८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. नंतर दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या नव्वदहून अधिक राहिली. असले तरी शंभरचा आकडा ओलांडला नव्‍हता. त्‍यातच बुधवारी ही संख्या १०२ वर पोचली. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५९, नाशिक ग्रामीणमधील ३६, जिल्‍हाबाहेरील सात रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. मालेगावला नव्‍याने बाधित आढळलेला नाही. तीन मृतांमध्ये नाशिक शहरातील एक, तर नाशिक ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे.


सायंकाळी उशिरापर्यंत ७८९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील ३४४, मालेगावचे २३४, नाशिक महापालिका क्षेत्रातील २११ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७२२ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ७११ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. पवार महाविद्यालयात प्रत्‍येकी एक रुग्ण दाखल झाला. ग्रामीणमध्ये सात, तर मालेगावच्‍या दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा: नाशिक शहर पोलिस ठाण्यांना नवे कारभारी; 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने ओलांडला हजाराचा आकडा

दीर्घ कालावधीनंतर जिल्‍ह्यातील उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराहून कमी झाली होती. मात्र, कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या तुलनेत नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या अधिक राहत आहे. परिणामी, ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत वाढ होत आहे. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने एक हजाराचा आकडा ओलांडला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार १७ बाधित उपचार घेत आहेत.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top