
पोकलॅन्ड मशिन खाली येऊन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; मशिन चालक फरार
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर पाचआळी परीसरातील भांगरे गल्लीतील अखील योगेश गमे (वय १२) हा आदिवासी बालक मोकळ्या जागेत खेळत होता. ह्या भागात सुधारित गटार व मलनिस्सारण योजनेचे कामाचे गटार खोदकाम चालु असलेल्या पोकलॅन्ड मशिनने मुले खेळणाऱ्या मोकळ्या जागेत जातांना योगेश गमे यास चिरडले. यात या मुलाच्या मेंदूचा जागेवर चेंदामेंदा झाला.
ही घटना कळताच युवकांचे जथ्थे संतप्त होऊन या जागेकडे जाउ लागल्यावर वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदिप रणदिवे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रभान जाधव व अश्विनी टिळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या बालकास प्रथम त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय व तेथून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
हेही वाचा: नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला साई धरणात बुडाला
मोकळ्या जागेत हे मशिन का नेण्यात आले? या बाबत संशय...
ह्या भागात अरुंद रस्त्यात खोदकाम सुरु असून विद्युत पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे बाहेरुन येणारी वाहने यात पडल्याचे येथील रहिवासी व माजी नगरसेवक मोहन भांगरे यांनी सांगितले. मोकळ्या जागेत हे मशिन का नेण्यात आले या बाबतीत संशय व्यक्त केला जात आहे. येथे घाईने काम उरकुन घेण्यासाठी तीन मशिन लावल्या असुन तीन्हींचे चालक फरार झाले आहेत. या कामांच्या दर्जा बाबतही स्थानिकांची नाराजी असतांना ते परतण्याची घाई सर्व दर्शवित आहे. चौतीस कोटी रुपयांची ही सुधारित गटार योजना पालिकेच्या मार्फत होत आहे.
हेही वाचा: नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी
Web Title: 12 Year Old Boy Dies After Falling Down Pokland Machine In Trimbakeshwar Nashik District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..