Nashik News : नाशिक रोड लोकअदालतीत 148 दावे निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

people court

Nashik News : नाशिक रोड लोकअदालतीत 148 दावे निकाली

नाशिक रोड (जि. नाशिक) : नाशिक रोड न्यायालयात शनिवारी (ता. ११) पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व वर्गवारीतील ठेवण्यात आलेल्या १०, २२० प्रकरणांपैकी १४८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली (Settled) काढण्यात यंत्रणेला यश मिळाले. (148 claims settled in Nashik Road Lok Adalat nashik news)

निकाली निघालेल्या दाव्यांतून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९०२ रुपये इतका महसूल वसूल झाला आहे. नाशिक रोड दिवाणी व फौजदारी तसेच मोटार वाहन न्यायालय, विधी प्राधिकरण नाशिक, नाशिक रोड वकील संघातर्फे नाशिक रोड न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

यात पॅनल क्रमांक १ मध्ये न्या. एस. एस. देशमुख, पॅनल मेंबर के. एस. कातकाडे, पॅनल क्रमांक २ मध्ये कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्या. ए. एस. डागा, माजी न्यायाधीश एस. आर. मालपाणी, पॅनल मेंबर अ‍ॅड. प्रतीक पवार, तसेच मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश डी. डी. कर्वे आणि अ‍ॅड. निकिता जोशी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण १०,२२० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४८ प्रकरणे निकाली निघून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९०२ रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर मोटार वाहन न्यायालयातील ३१८ प्रकरणे निकाली निघून १३ लाख ११ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजासाठी नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, अ‍ॅड. बी. बी. आरणे, अ‍ॅड. अविनाश भोसले, अ‍ॅड. उमेश साठे, अ‍ॅड. दीपक ताजनपुरे, अ‍ॅड. अंकुश निकम, अ‍ॅड. विलास ताजनपुरे, अ‍ॅड. विश्वास चौगुले, अ‍ॅड. गणेश मानकर, अ‍ॅड. राजेंद्र लोणे, अ‍ॅड. आत्माराम वालझडे, अ‍ॅड. योगेश लकारिया, अ‍ॅड. प्रिया बावीस्कर, अ‍ॅड. कुलदीप यादव, अ‍ॅड. एकता आहुजा, अ‍ॅड. ब्रिजेश रामराजे, अ‍ॅड. रमेश रसाळ, सहाय्यक अधीक्षक ए. एन. बागुल, मनोज मंडाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikCourtLaw and Order