Nashik News: नाशिक जिल्ह्यात 15 नवीन मतदान केंद्रे : डॉ. शशिकांत मंगरुळे

voting
votingsakal

Nashik News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.

त्यात जिल्ह्यात विधानसभेच्या विविध मतदारसंघांत एकूण १५ नवीन मतदार केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. (15 new polling stations in Nashik district Dr Shashikant Mangarule Nashik News)

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण उपक्रमात प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्रांची मतदारांच्या सोयी-सुविधा उपलब्धतेची तपासणी करून एकूण १५६ मतदान केंद्रे खोल्यांत बदल करून नवीन केंद्र खोल्या घेतल्या आहेत.

एक हजार ५०० हून अधिक संख्यांच्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आठ व येवला विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे एकूण नऊ नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील पेठ तालुक्यातील दुर्गम भागात सहा नवीन मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात एकूण १५ नवीन मतदान केंद्रे निर्माण झाल्याने पूर्वीच्या चार हजार ७२४ मतदान केंद्रांच्या संख्येत भर पडून आता चार हजार ७३९ इतकी केंद्रे झाली आहेत.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत २७ ऑक्टोबरला मतदार याद्यांचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे.

voting
Nashik: बांधकाम 3च्या कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाईचा बडगा; ZP अतिरिक्त CEO यांच्याकडून अहवाल सादर

त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे, मृत व स्थलांतरित मतदारांना वगळणे, ही कामे प्रत्येक मतदार यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार आहेत.

त्यात अधिकाधिक नागरिकांसाठी ४ व ५ नोव्हेंबर आणि २५ व २६ नोव्हेंबर असे चार दिवस जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे होणार आहेत.

शिबिरांत मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, मतदार तपशील दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरून घेतले जातील. तसेच, वोटर हेल्पलाइन अॅप्लिकेशन आणि Voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२४ ला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क प्राप्त करून घ्यावा, असेही आवाहन डॉ. मंगरुळे यांनी केले.

voting
Nashik: ग्राहकांच्‍या प्रतिसादाने सराफी पेढीला झळाळी! गतवर्षीच्‍या तुलनेत व्‍यवसायात 15 टक्क्‍यांपर्यंत नोंदविली वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com