esakal | नाशिक जिल्ह्यात दिवसभरात आढळले १६५ कोरोना बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात आढळले १६५ कोरोना बाधित

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत चढ-उतार बघायला मिळत आहेत. बुधवारी (ता. २१) जिल्ह्यात १६५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर १४१ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. जिल्ह्यात एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २३ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ४४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (165 new corona positive patients reported in district)

बुधवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात १०८ रुग्‍णांचे, नाशिक महापालिका क्षेत्रात ५५, तर जिल्‍हाबाहेरील दोन रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात एकही बाधित आढळून आला नाही. जिल्ह्यात दिवसभरात एकाच बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीणमधील आहे.

हेही वाचा: वाडीवऱ्हे जवळ भीषण अपघातात नाशिकचे तीघे जागीच ठार; २ जण गंभीर

सायंकाळी उशिरापर्यंत ८९६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात सर्वाधिक ४६४ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक शहरात २९५, मालेगाव मनपा क्षेत्रात १३७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४८६ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ४५८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणच्‍या चौदा, तर मालेगावच्‍या दहा रुग्‍णांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख एक हजार ६०० झाली आहे. यातून तीन लाख ९१ हजार ६७१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आत्तापर्यंत आठ हजार ४८३ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

loading image