esakal | नाशिककरांना दिलासा! जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या 2 हजारांच्‍या आत
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या 2 हजारांच्‍या आत

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या चिंताजनक राहात आहे. मंगळवारी (ता.६) जिल्ह्यात आठ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. तर दिवसभरात १७४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. ३०४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या दोन हजारांच्‍या आत आली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ८६५ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (174 news corona positive patients reported in nashik district)


मंगळवारी (ता.६) नाशिक शहरातील पाच तर नाशिक ग्रामीणमधील चार बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. तर नाशिक ग्रामीणमध्ये ९९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. नाशिक शहरातील ६४ तर मालेगावच्‍या सात, जिल्‍हा बाहेरील चार रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

सायंकाळी उशीरापर्यंत ९५२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीणमधील ४४५, मालेगावचे २५७, नाशिक महापालिका क्षेत्रातील अडीचशे रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हा भरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चारशे रुग्‍ण रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३७४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. दरम्‍यान बरे होणार्या रुग्‍णांच्‍या संख्येत गेल्‍या काही दिवसांपासून सातत्‍याने वाढ होत असल्‍याने दीर्घ कालावधीनंतर ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी झाली आहे.

(174 news corona positive patients reported in nashik district)

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

loading image