Nashik Accident Update : शहरात गेल्या वर्षात रस्ता अपघाताचे 182 बळी

Accident News
Accident Newsesakal

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांनी कात टाकली खरी, परंतु या रस्त्यांवरून वाहनांची वेगमर्यादा वाढली. परिणामी गेल्या २०२२ या वर्षात नाशिक शहर हद्दीमध्ये झालेल्या रस्ता अपघातांमध्ये १८२ जणांचा हकनाक बळी गेला आहे. तर, ४५२ जण अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत.

नाशिकमधील प्रशस्त रस्ते शहराच्या विकासाचे चित्र रंगवत असताना, दुसरीकडे हेच रस्ते भरधाव वेगाच्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांनी रक्तरंजित होताहेत. पोलिसांकडून हेल्मेटसक्तीसह नानाविध उपक्रमांसह उपाययोजना केल्या जात असतानाही नाशिक शहर अपघाती मृत्यूने धोकादायक ठरू पाहतेय. (182 victims of road accidents in city last year 461 accidents on wide roads and reckless speed Nashik Accident News)

Accident News
Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर

गेल्या जानेवारी ते डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत शहरातील विविध रस्त्यावर झालेल्या १६४ अपघातांमध्ये १८२ जणांनी प्राण गमावले आहेत. गत ऑक्टोबर महिन्यात रस्ता अपघातांमध्ये सर्वाधिक २४ जणांचा बळी गेला आहे. तर, सर्वाधिक अपघात हे एप्रिल महिन्यात २० झाले आहेत. अर्थात यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय असून, भरधाव वेगात दुचाकी चालविण्याचे हे बळी ठरले आहेत. शहरात हेल्मेटसक्ती आहे. त्याचप्रमाणे, हेल्मेटसक्ती करतानाच दंडात्मक कारवाई केली जाते. शिवाय, वाहनचालकांमध्ये जनजागृती होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रमही राबविले. मात्र तरीही गतवर्षात झालेली अपघाती बळी चिंतनीय बाब आहे. शहर वाहतूक पोलिसांकडून ‘हेल्मेट वापरा, जीव वाचवा’ संदेश वारंवार दिला जात असून तो गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होते आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Accident News
Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर

दोष कुणाचा, रस्ते की वेग?
शहराचा विकास मूलभूत सोयी- सुविधातून दिसतो तसाच प्रशस्त रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. नाशिकच्या रस्त्यांची नेहमीच तारीफ होत असताना, याच रस्त्यांवर नवनवीन प्रकारची भरधाव वेगात धावणारी वाहने धावताहेत. तीही सीटबेल्ट न लावता, हेल्मेट न वापरता वेगावरील नियंत्रण सुटते आणि अपघाती जीव जातो. यात एका कुटुंबातील व्यक्ती जाते, आधार जातो. चांगले रस्ते ही काळाची गरज आहे, तसेच मर्यादित वेग राखणे प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे व वेगाची मर्यादा राखल्यास अपघात टाळता येऊ शकतो, तरी दोष कुणाचा हा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जातो.

Accident News
Nashik Municipal News : नाशिक मनपाचे अंदाजपत्रक होणार विलंबाने सादर

ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू
२०२२ या वर्षात सर्वाधिक २० अपघात मे महिन्यात झाले असून २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ऑक्टोबर महिन्यात १२ अपघातांमध्ये २४ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर या अपघातांमध्ये ९४ जण गंभीररीत्या जखमी, १२ किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे मयत, जखमींचे सर्वाधिक प्रमाण या ऑक्टोबर महिन्यात होते, हे स्पष्ट होते.

Accident News
Nashik Municipal News : जाहिरात शुल्क वाढीचा निर्णय ठराविक ठेकेदारांसाठी

२०२२ मधील अपघातांची आकडेवारी : २०२२)
महिना : फेटल अपघात : एकूण मयत : गंभीर जखमी : किरकोळ जखमी : एकूण जखमी
जानेवारी : १५ १५ ३५ ६ ५६
फेब्रुवारी : १६ १७ ४१ १ ५९
मार्च : १३ १५ ३६ १४ ६५
एप्रिल : १७ १८ ३६ ४ ५८
मे : २० २१ ३८ १४ ७३
जून : १७ १७ ३५ ०० ५२
जुलै : ४ ४ २४ १
ऑगस्ट : १२ १२ २३ ४ ३९
सप्टेंबर : १३ १३ २६ ६ ४५
ऑक्टोबर : १२ २४ ९४ १२ १३०
नोव्हेंबर : १० १० ३६ ५ ५१
डिसेंबर : १५ १६ २८ २५ ६९
एकूण : १६४ १८२ ४५२ ९२ ७२६

"वाहतूक पोलिस शाखेकडून अपघात रोखण्यासाठीच्या सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. हेल्मेटचा वापर करावा, सीटबेल्ट वापरावा याबाबत जनजागृती करताना प्रबोधनही केले जाते. परंतु, चालकांना हेल्मेटचे ओझे का वाटावे याचे नवल वाटते. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांना आळा बसू शकतो."
- पौर्णिमा चौघुले, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com