esakal | महत्वाची बातमी : जूनपासून धावणार १९ विशेष श्रमिक रेल्वेगाड्या..'या' आहेत गाड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

madhya railway.jpg

आजारी प्रवाशाला भाडे परत मिळविण्यासाठी जागेवरच प्रमाणपत्र देऊन परत पाठविले जाईल. वातानुकूलित डब्यात खिडक्‍यांना पडदे, झोपण्याचे बेड नसतील. प्रवासात जेवण-पाणी स्वतः घेऊन यावे. तसेच आयआरसीटीसी पेंट्री कारमधील खाद्यपदार्थ उपलब्ध असतील, तसेच विविध स्थानकांवर स्टॉलवर खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.

महत्वाची बातमी : जूनपासून धावणार १९ विशेष श्रमिक रेल्वेगाड्या..'या' आहेत गाड्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रेल्वे मंत्रालयाने सोमवार (ता.1) पासून भुसावळ विभागातून 19 विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. 

'या' प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाकारली जाणार 

जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वेत कन्फर्म तिकीट आणि मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप असलेल्यांना परवानगी असेल. रेल्वे सुटण्यापूर्वी दीड तास आधी रेल्वेस्थानकात पोचून तापमानाची तपासणी सक्तीची असेल. ताप किंवा कोरोनासदृश्‍य रोगाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाकारली जाईल. आजारी प्रवाशाला भाडे परत मिळविण्यासाठी जागेवरच प्रमाणपत्र देऊन परत पाठविले जाईल. वातानुकूलित डब्यात खिडक्‍यांना पडदे, झोपण्याचे बेड नसतील. प्रवासात जेवण-पाणी स्वतः घेऊन यावे. तसेच आयआरसीटीसी पेंट्री कारमधील खाद्यपदार्थ उपलब्ध असतील, तसेच विविध स्थानकांवर स्टॉलवर खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. या काळात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री मात्र बंद राहणार आहे. विशेष गाड्यांच्या तिकिटाचे पैसे परत पाठविण्याचे नियम पूर्वीप्रमाणेच असतील. 

भुसावळ विभागातून विशेष गाड्या 
01) 01016/01015 अप डाउन गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्‍स्प्रेस 
02) 01061/01062 अप डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्‍स्प्रेस 
03) 01071/01072 अप डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्‍स्प्रेस 
04) 01093/01094 अप डाउन मुंबई वाराणसी महानगरी एक्‍स्प्रेस 
05) 02533/02534 अप डाउन मुंबई लखनौ पुष्पक एक्‍स्प्रेस 
06) 02617/02618 अप डाउन हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्‍स्प्रेस 
07) 02629/02630 अप डाउन नवी दिल्ली यशवंतपूर कर्नाटका संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस 
08) 02715/02716 अप डाउन नांदेड अमृतसर सचखंड एक्‍स्प्रेस 
09) 02810/02809 अप डाउन हावडा-मुंबई मेल 
10) 02833/02834 अप डाऊन अहमदाबाद-हावडा एक्‍स्प्रेस 
11) 09045/09046 अप डाउन सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्‍स्प्रेस 
12) 03201/03202 अप डाउन पाटणा लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्‍स्प्रेस 
13) 02141/02142 अप डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्‍स्प्रेस 
14) 02541/02542 अप डाउन गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस 
15) 02149/02150 अप डाउन पुणे-दानापूर एक्‍स्प्रेस 
16) 05645/05646 अप डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गुवाहाटी एक्‍स्प्रेस 
17) 09090/09089 अप डाउन अहमदाबाद मुजफ्फरपूर एक्‍स्प्रेस व्हाया सुरत 
18) 09084/09083 अप डाउन अहमदाबाद ते गोरखपूर एक्‍स्प्रेस व्हाया सुरत 
19) 02779/02780 अप डाउन वास्को-द-गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्‍स्प्रेस

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

loading image
go to top