National Council of Vedashastra: गुरुवारपासून 2 दिवसीय राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद!

मान्यवरांच्या उपस्थितीत वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण
Prof. Dr. Hare Ram Tripathi
Prof. Dr. Hare Ram Tripathiesakal

National Council of Vedashastra : येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, दक्षिणाम्नाय श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्यातर्फे नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजता सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात परिषदेला प्रारंभ होईल. शुक्रवारी (ता.१४) मान्यवरांच्या उपस्थितीत वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण शंकराचार्य न्यासात होईल. (2 day National Council of Vedashastra from Thursday nashik)

शुक्रवारी (ता.१४) महापरिषदेचे उद्‌घाटन प्रा. डॉ. हरे राम त्रिपाठी ( कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर) यांच्या हस्ते होईल. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार प्रदान सोहळा होईल.

प्रतिष्ठानचे सचिव व प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे निमंत्रक आहेत. गुरुवारी साडेबारा वाजता गोपाल मंगल कार्यालयात महापरिषदेचे उदघाट्न सत्र होईल. त्यानंतर वैदिक संहिता, जन संज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद होणार आहे.

त्यामध्ये प्रा. हरेराम त्रिपाठी, वेदशास्त्र संपन्न गणेशशात्री द्रविड, वेदांतरत्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी, स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे सहभागी होतील. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर परिसंवादाचे संचालन करणार आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते सन्मान वितरित होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Prof. Dr. Hare Ram Tripathi
Gautam Adani Meet Sharad Pawar: रात्रीस खेळ चाले, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

यांचा होणार सन्मान-

कै. भास्कर अण्णा जोशी स्मरणार्थ राष्ट्रीय वेदशास्त्र शिरोमणी पुरस्कार वाराणसीचे गणेश्वरशास्त्री द्रविड यांना प्रदान करण्यात येणार आहे.

धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार चेन्नईचे हरीहरन घनपाठी यांना, वेदाचार्य शांताराम भानोसे यांना यजुर्वेदासाठी, तर सामवेद पुरस्कार बंगळूरचे मानस मिश्रा यांना व अथर्ववेद पुरस्कार जालन्याचे दिनकर जोशी यांना प्रदान करण्यात येतील.

संस्कृत सेवाव्रती राष्ट्रीय पुरस्कार रामटेकचे मधुसूदन पेंना, नाशिकच्या वैशाली वैद्य यांना जाहीर झाले आहेत. वेदमूर्ती कै. नंदकुमार हरदास वेदवेदांग पुरस्कार नाशिकचे अभयशास्त्री पाठक व वैदिक छात्र पुरस्कार वेदमूर्ती सौरभ पाठक यांना देण्यात येतील. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

Prof. Dr. Hare Ram Tripathi
Sharad Pawar On Bhujbal : भुजबळ सोडून गेल्याचं दुःख वाटतं का? शरद पवार म्हणाले, तो माझा दोष…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com