गोठ्यातल्या शेळ्या बिबट्याने केल्या फस्त; ग्रामस्थांमध्ये घबराट

गोठ्यातल्या शेळ्या बिबट्याने केल्या फस्त; ग्रामस्थांमध्ये घबराट
leopards
leopardsSakal

नरकोळ (जि. नाशिक) : ढोलबारे (ता. बागलाण) येथील शेतकरी बारकू काशीनाथ गोयेकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने (Leopard) फस्त केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

परिसरात बिबट्याचा गेल्या आठवड्यापासून मुक्तपणे संचार सुरू असून, दररोज नागरीकांना दर्शन घडत आहे. शेतकरी बारकू गोयेकर यांच्या शेतात वास्तव्य असून, शनिवारी (ता. १९) मध्यरात्री तीनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यातील दोन शेळ्यांवर हल्ला करून ठार केले. यात शेतकऱ्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या वास्तव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनरक्षक ममता बोडके यांनी पंचनामा केला. या वेळी पोलिस पाटील बापू गोयेकर, सरपंच कुशन डोमाळे, उपसरपंच साहेबराव सुळ, शिक्षक दशरथ गोयेकर उपस्थित होते.

leopards
चोरांच्या नजरेतून मंदिरेही सुटेना; महादेव मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला

''आमच्या गावात मोठ्या प्रमाणात डोंगररांगा असून, बिबट्याचा वावर कायम असतो. शेतकऱ्यांना पिकांना रात्रीचे पाणी द्यावे लागते. त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा.'' - रतन गोयेकर, ढोलबारे (ता. सटाणा)

leopards
दोद्धेश्वरला बिबट्याचा मुक्तसंचार; पंचक्रोशीत भीतीचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com