esakal | लग्नाच्या नावाखाली 100 ते 200 जणांची गर्दी; मुंबई-आग्रा महामार्गावरील २ हॉटेल सील
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मुंबई-आग्रा महामार्गावरील चंदनपुरी शिवारातील हॉटेल ग्रॅंड सविता व महामार्गावरील हॉटेल शिवा पंजाब या दोन हॉटेल सील करण्यात आले आहे.

मालेगावातील २ हॉटेल सील; गर्दी करून विवाह सोहळे

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह परिसरातील हॉटेलांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याच्या नावाखाली शंभर ते दोनशे जणांची गर्दी करून विवाह सोहळे (wedding) होत होते. काही हॉटेलांमध्ये साथरोग प्रतिबंधक व कोरोना प्रतिबंधक नियमांचे (corona virus rules break) सर्रास उल्लंघन होत होते. शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. (2-hotel-seals-in-Malegaon)

विविध हॉटेलांमध्ये लग्नाचा बार उडविणाऱ्यांना धडकी

कोरोना (Corona virus) काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मुंबई-आग्रा महामार्गावरील चंदनपुरी शिवारातील हॉटेल ग्रॅंड सविता व महामार्गावरील हॉटेल शिवा पंजाब या दोन हॉटेलला सील ठोकण्याचे आदेश प्रांताधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिले. दोन्ही हॉटेल आस्थापनांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एक लाख रुपये दंड करण्यात आला. महसूल विभागाने प्रथमच धडाकेबाज कारवाई केली. यामुळे विविध हॉटेलांमध्ये लग्नाचा बार उडविणाऱ्यांना धडकी भरली आहे.

हेही वाचा: अजंगची सासुरवाशीण मुंबईत लोको पायलट!

कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन

शहरासह परिसरातील हॉटेलांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याच्या नावाखाली शंभर ते दोनशे जणांची गर्दी करून विवाह सोहळे होत होते. काही हॉटेलांमध्ये साथरोग प्रतिबंधक व कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. प्रांताधिकारी शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, संबंधित तलाठी व महसूल पथकाने बुधवारी (ता. २६) अचानक या हॉटेलची तपासणी केली असता तेथे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने दोन्ही हॉटेलला सील ठोकतानाच पुढील आदेश होईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचा व ५० हजार रुपये दंडाचा आदेश देण्यात आला. महसूल पथकाने दोन्ही हॉटेले सील केली. ही हॉटेले ज्या कार्यक्षेत्रात आहेत त्या किल्ला व तालुका पोलिसांना आदेशाची प्रत पाठविण्यात आली. त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाईची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आदींना कळविण्यात आली आहे.

(Violation of the Disaster Management Act 2 hotel seals in Malegaon)

हेही वाचा: कोरोनाच्या प्रादुर्भावावर लॉकडाउन उपाय की अपाय?

हेही वाचा: कोरोना काळात ठेवा पॉझिटिव्ह विचार; जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल