Nashik Crime : प्राणघातक हल्ल्यातील दोघा संशयितांना अटक; शहरातून पसार होताना गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद

दोघे मध्यरात्री शहरातून पसार होण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आले असता दबा धरून असलेल्या शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने जेरबंद केले
jailed
jailedesakal

नाशिक : नाशिक रोड परिसरातील शिकलकर वस्ती येथे भांडणाची कुरापत काढून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर संशयित दडून बसले होते.

त्यापैकी दोघे मध्यरात्री शहरातून पसार होण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आले असता दबा धरून असलेल्या शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने जेरबंद केले. (2 suspects arrested in deadly attack passing through city anti gang squad made arrests Nashik Crime)

सादिक सलीम शेख (१९), सकलेन फिरोज शेख (१८, दोघे रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. १) रात्री प्रकाश कांबळे, अतिष कांबळे यांच्या संशयित हुसेन शेख, सकलेन शेख, रजिक बाकसी, सोहेल शेख, अमन शेख, इमरान शेख, निरंक नरोटे, एजाज रफिक मनियार उर्फ फज्जा, सादिक सलिम शेख, फरदीन, अक्षय घोडेराव उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव, चैतन्य बोंदरे यांच्यासह पाच-सहा जणांनी लोखंडी रॉड, कोयत्याने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयितांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

jailed
Nashik Crime : फर्नांडिसवाडीत गँगवॉरचा भडका! गोळीबार प्रकरणातील संशयिताला कोठडी

दरम्यान, यातील दोघे संशयित सादिक व सकलेन हे मध्यरात्री शहरातून पसार होण्याची तयारी असून ते ठक्कर बाजार बसस्थानकात येणार असल्याची खबर गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती.

त्यानुसार सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांच्या पथकाने ठक्कर बाजार बसस्थानकात सापळा रचला.

संशयित दोघे येताच त्यांना शिताफीने अटक केली. संशयितांना नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jailed
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com