Nashik Fraud Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा मोह पडला भारी; बसला लाखोंचा गंडा

Share Market Fraud Crime
Share Market Fraud Crimeesakal

नाशिक : शेअर ट्रेडिंग कंपनी स्थापून शेअर मार्केटमधील आर्थिक गुंतवणुकीवर दामदुपटीने आमिष दाखवून दोघा संशयितांनी एकाला तब्बल २० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (20 lakhs cheated in stock market with lure of doubling money Nashik Crime News)

अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड), इशा जैस्वाल अशी दोघा संशयितांची नावे आहेत. प्रदीप नामदेव मंडळ (रा. सातमाऊली चौक, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सूर्यवंशी व जैस्वाल या दोघांनी शेअर मार्केट संदर्भातील ट्रेडिंग कंपनी बोधलेनगरमधील जमीन अपार्टमेंटमध्ये सुरू केली होती.

या दरम्यान फिर्यादी मंडळ हे संशयितांच्या संपर्कात आले. त्या वेळी संशयितांनी मंडळ यांना शेअर मार्केटमधील आर्थिक गुंतवणुकीवर ११ महिन्यांत दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Share Market Fraud Crime
Akola Crime News : सहा जणांना दुहेरी जन्मठेप!

त्यानुसार, संशयितांच्या आमिषाला बळी पडून मंडळ व त्याच्या नातलगांनी या कंपनीच्या माध्यमातून २० लाख रुपयांची आर्थिक गुंतवणूक मार्च २०२२ ते २७ मार्च २०२३ यादरम्यान २० लाख रुपये गुंतविले.

मात्र ११ महिने उलटूनही ठरल्याप्रमाणे रक्कम न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस धाव घेत तक्रार दिली. सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे हे तपास करीत आहेत.

Share Market Fraud Crime
Dhule Crime News : प्लॅस्टिक कचऱ्याआडून गुटखा तस्करी; धुळे एलसीबीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com