
Nashik News : RTOतर्फे शिकाऊ- पक्क्या licenseचे कामकाज करण्याकरिता 2023च्या तारखा जाहीर!
पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या हितास्तव तालुका स्तरावर दर वर्षी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. शिबिर दौऱ्यात शिकाऊ आणि पक्क्या अनुज्ञप्तीचे कामकाज करण्यात येतात. त्याकरिता महिनानिहाय मासिक तालुकास्तरावरील शिबिर कार्यक्रमाचे शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे कामकाज करण्याकरिता २०२३ च्या नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहेत.
तरी सर्व संबंधित नागरिकांनी आपली अनुज्ञप्तीचे कामे शिबिर कार्यक्रमात करून घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. (2023 dates announced by RTO for working of learner final license nashik news)
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय मासिक तालुकानिहाय शिबिर कार्यक्रम वर्ष २०२३ तालुका (पिंपळगाव बसवंत) २ व १८ जानेवारी, १ व १७ फेब्रुवारी, १ व १७ मार्च, ३ व १९ एप्रिल, २ व १९ मे, १ व १६ जून, ३ व १९ जुलै, १ व २१ ऑगस्ट, १ व १८ सप्टेंबर, ३ व १८ ऑक्टोबर, १ व १७ नोव्हेंबर, १ व १८ डिसेंबर.
(सिन्नर) ४ व २० जानेवारी, ३ व २० फेब्रुवारी, ३ व २० मार्च, ५ व २१ एप्रिल, ४ व २२ मे, २ व १९ जून, ५ व २१ जुलै, ३ व २३ ऑगस्ट, ४ व २० सप्टेंबर, ५ व २० ऑक्टोबर, २ व २० नोव्हेंबर, ४ व २० डिसेंबर.
(येवला) ६ व २३ जानेवारी, ६ व २२ फेब्रुवारी, ६ व २१ मार्च, ६ व २४ एप्रिल, ८ व २४ मे, ५ व २१ जून, ७ व २४ जुलै, ४ व २५ ऑगस्ट, ६ व २२ सप्टेंबर, ६ व २३ ऑक्टोबर, ३ व २२ नोव्हेंबर, ६ व २१ डिसेंबर.
हेही वाचा: Police Recruitment : पोलिस भरती अर्ज दाखल; प्रत्यक्ष प्रक्रियेची मात्र उमेदवारांना प्रतीक्षा!
(निफाड) ९ जानेवारी, ८ फेब्रुवारी, ८ मार्च, १० एप्रिल, १० मे, ७ जून, १० जुलै, ८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर, ९ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर, ८ डिसेंबर.
(घोटी) ११ जानेवारी, १० फेब्रुवारी, १० मार्च, १२ एप्रिल, १२ मे, ९ जून, १२ जुलै, १४ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १३ ऑक्टोबर, ९ नोव्हेंबर, १३ डिसेंबर.
(लासलगाव) १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी, १३ मार्च, १३ एप्रिल, १५ मे, १२ जून, १४ जुलै, ११ ऑगस्ट, १३ सप्टेंबर, १३ ऑक्टोबर, ९ नोव्हेंबर, १३ डिसेंबर,
(दिंडोरी) १६ जानेवारी, २३ फेब्रुवारी, १५ मार्च, २८ एप्रिल, १७ मे, २८ जून, १७ जुलै, १४ ऑगस्ट, १५ सप्टेंबर, ३० ऑक्टोबर, १६ नोव्हेंबर, २९ डिसेंबर.
(वणी) १५ फेब्रुवारी, १७ एप्रिल, १४ जून, १७ ऑगस्ट, १६ ऑक्टोबर, १५ डिसेंबर.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Nashik News : सप्तशृंगी गडावर भाविकांच्या गाडीला अपघात; 25 हुन अधिक जखमी
(चांदवड) २५ जानेवारी, २४ फेब्रुवारी, २४ मार्च, २६ एप्रिल, २६ मे, २३ जून, २५ जुलै, २८ ऑगस्ट, २५ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, २३ नोव्हेंबर, २२ डिसेंबर.
(त्र्यंबकेश्वर) २७ जानेवारी, २७ फेब्रुवारी, २७ मार्च, २७ एप्रिल, २९ मे, २६ जून, २७ जुलै, २९ ऑगस्ट, २६ सप्टेंबर, २७ ऑक्टोबर, २४ नोव्हेंबर, २७ डिसेंबर.
(सुरगाणा) ३० जानेवारी, २९ मार्च, ३० मे, २८ जुलै, २७ सप्टेंबर, २८ नोव्हेबर.
शिबिराच्या दिवशी काही कारणास्तव सुटी जाहीर झाल्यास शिबिराचे कामकाज पुढील कार्यालयीन दिवशी ठेवण्यात येईल, असेही प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा: Nashik Crime News : कामात हलगर्जीपणाचा जाब विचारल्याने महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयचा प्राणघातक हल्ला!