Nashik News : 2300 वर्षे जुन्या बोधिवृक्षाचा 23 मेस प्राणप्रतिष्ठा सोहळा!

MLA Ad. Rural Development Minister Girish Mahajan and Bhante along with Rahul Dhikle.
MLA Ad. Rural Development Minister Girish Mahajan and Bhante along with Rahul Dhikle.esakal

Nashik News : भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या तेवीसशे वर्षे जुन्या बोधिवृक्षाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुद्ध स्मारकात होणार आहे.

यानिमित्त २३ व २४ मेस विशेष सोहळा होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, श्रीलंकेचे बुद्धशासना व संस्कृतीमंत्री विदूर विक्रमनायके उपस्थित राहणार आहेत. (23 May Pranpratistha ceremony of 2300 years old Bodhi tree Nashik News nashik news)

श्रीलंकेतील अनुराधापूर येथे सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी २३०० वर्षांपूर्वी बोधिवृक्षाची स्थापना केली. याच वृक्षाची फांदी नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाशिकमध्ये आणली जाणार आहे.

या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रीलंकन सरकारने परवानगी दिली. २३ मेस विशेष विमानाने मुंबईत बोधिवृक्षाची फांदी आणली जाईल. त्यानंतर २३ व २४ मेस त्याचे रोपण केले जाईल.

आमदार ढिकले यांचा पाठपुरावा

नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी दिली. त्यानुसार बुद्ध स्मारकातील नियोजित जागेची पाहणी केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

MLA Ad. Rural Development Minister Girish Mahajan and Bhante along with Rahul Dhikle.
SAKAL Achievement: उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ’ला दुहेरी यश! सकाळ साप्ताहिक’, ‘सकाळ मनी’ला पारितोषिक

बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण केल्यानंतर तारेचे कुंपण घालणे, पोलिस बंदोबस्त लावणे, बौद्ध भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था करणे आदी कामे केली जाणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य संयोजक भिक्खू सुगंत थेरो,

मुख्य निमंत्रक भिक्खू संघरत्न, भन्ते धम्मरक्षित, महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक जगदीश राऊत, बुद्ध स्मारकाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे, निवृत्त सहकार विभागीय निबंधक गौतम भालेराव, बॉबी काळे, दिलीप साळवे, शरद काळे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

"श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचा रोपण सोहळा नाशिकच्या लौकिकात भर घालणारा ठरणार आहे."

-ॲड. राहुल ढिकले, आमदार

MLA Ad. Rural Development Minister Girish Mahajan and Bhante along with Rahul Dhikle.
Nashik News : नाशिकचे ‘व्हिसलमॅन' ‘मन की बात'च्या शंभराव्या भागासाठी दिल्लीत आमंत्रित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com