नाशिक : दुगारवाडी धबधब्यावर गेलेले 23 जण अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dugarwadi waterfall nashik

नाशिक : दुगारवाडी धबधब्यावर गेलेले 23 जण अडकले

नाशिक : रविवारच्या पावसाळी पर्यटनाला दुगारवाडी धबधब्यावर येथे गेलेले २३ पर्यटक अडकले आहेत. तर पाच जण रात्री उशिरा सुखरूप निघाले. रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आल्यावर नाशिकहुन एक पथक घटनास्थळी जात आहे. तहसीलदार दीपक गिरासे, तसेच दयानंद कोळी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक अडकलेल्या पर्यटकांना काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा: वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

रविवारची सुट्टी असल्याने नाशिक हुन २८ जण आज दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते सांयकाळी पावसाचा जोर वाढला मुसळधार पावसाने काही वेळेतच उग्र रूप धारण केले धबधबा ओलांडून गेलेल्यापैकी ५ जण कसे बसे आले असताना नदीला सोबतच धबधब्यावर पाण्याचा जोर वाढला त्यामुळे साधारण २३ जण त्या पलिकडच्या बाजूला अडकून राहिले पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल या आशेवर वाट पहात बसल्याचा रात्री धीर खचू लागला त्यात त्या भागात मोबाईल रेंज नसल्याने हा सगळा प्रकार लक्षात यायला उशीर झाला त्रंबकेश्वर आणि नाशिक येथून पथक रवाना झाली असून पूर ओसरण्याची सगळ्यांना प्रतिक्षा आहे.

हेही वाचा: खांबाळेचा धबधबा सुरक्षित पर्यटनासाठी घालतोय साद

त्र्यंबकेश्वर हे नाशिकमधील बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असून त्र्यंबकेश्वर शहराच्या आसपासचा परिसर हा डोंगर आणि निसर्गाने नटलेला आहे. ब्रह्मगिरी, अंजनेरी सारख्या पर्वत रांगांवर पावसाळ्यात निसर्गाच सौंदर्य अधिक खुलत जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत. याच पर्वत रांगांमधून पावसाळ्यात धबधबे वाहतात. यापैकीच एक दुगारवाडी धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होतो. अनेक पर्यटक विशेष करून तरुणाईला याचे विशेष आकर्षण असते. पावसाळ्यात येथे अधिकाधिक गर्दी होत असते. हे धबधबे जितके आकर्षक आहेत तीतकेच धोकादायकही आहेत. येथे पर्यकटकांच्या पर्यटनावर अनेकदा प्रशासनातर्फे बंदीही मात्र तरीही तरुणाई प्रशासनाचे आदेश न जुमानता येथे जात असतात. याचाच प्रत्यय रविरवारच्या या घटनेवरून आला आहे.

हेही वाचा: MH Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; कोकणात जोर वाढणार - IMD

Web Title: 23 Tourists Got Stuck At Dugarwadi Waterfall In Trimbakeshwar Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..