Heavy rain
Heavy rainsakal

MH Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; कोकणात जोर वाढणार - IMD

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
Published on
Summary

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यात जुलैच्या मध्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने आता पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसाचा प्रभाव कोकणात अधित असेल असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे. मुंबईत 7 आणि 8 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heavy rain
आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी; निलेश राणेंची केसरकरांना ऑफर

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 8 ते 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये मुंबईसह उत्तर कोकणातील पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबत विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy rain
संजय राऊत जेलमधून लिखाण करतायत?; मनसेची शंका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com