Nashik News : पंचवटी रुग्णालयाचा 232 कोटीचा आराखडा; आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मिळण्याची शक्यता
Hospital
Hospitalesakal

नाशिक : पंचवटी विभागातील नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या तीनशे खाटांच्या रुग्णालयाचा आराखडा तयार झाला आहे. एकूण २३२ कोटी रुपयांचा आराखडा आरोग्य मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात रुग्णालयाला निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नाशिक रोडच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाप्रमाणे सुविधा असलेले रुग्णालयाची मागणी पंचवटीकरांची आहे. (232 crore plan of Panchavati Hospital Proposal submitted to Ministry of Health Nashik News)

पंचवटी विभागात स्लम एरिया, तसेच मळे विभाग मोठ्या प्रमाणात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात लाख भाविक नाशिकमध्ये येतात. पंचवटी विभागात महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय असले तरी या पन्नास खाटांच्या रुग्णालयात फक्त प्रसूती व लसीकरण केले जाते.

त्यामुळे आपत्कालीन उपचारासाठी रुग्णालयाची मागणी होती. पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मालेगाव स्टॅन्ड महापालिकेच्या भांडार विभागातील महापालिकेच्या जागेवर रूग्णालय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्याअनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वैद्यकीय विभाग व नगररचना विभागाला जागेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा आराखडा निश्चित करण्यात आला.

रुग्णालयात २५ विशेष तज्ञ, ३९ वैद्यकीय अधिकारी, २२४ स्टाफ नर्स, ६८ तांत्रिक, , २४ प्रशासनिक, १० डाटा एन्ट्री ऑपरेटर, ६० वॉर्डबॉय, ४८ आयांची पदभरती केली जाणार आहे. रुग्णालयासाठी वार्षिक जवळपास ३५ कोटी रुपये निधी खर्च होणार आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Hospital
Election 2023 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्याने इच्छुकांची कोंडी, खर्चातही वाढ

रुग्णालयाची आवश्‍यकता

पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रूग्णालयात मागील तीन वर्षात बाह्यरुग्ण विभागात ६१ हजार १२० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णालयाची आवश्‍यकता नोंदविण्यात आली आहे. २ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर १०० खाटांचे रुग्णालय होवू शकते.

दोन ते पाच लाखांपर्यंत लोकसंख्या असल्यास २०० खाटांचे पाच ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असल्यास तीनशे बेडचे रुग्णालय उभारणे शक्य आहे. पंचवटी विभागात अंदाजित आठ लोकसंख्येचा विचार करून तीनशे खाटांचे रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे.

मालेगाव स्टॅन्ड वरील अग्निशामक दलाच्या कार्यालयाला लागून असलेली चौदा हजार १९४ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

"नागरिकांची वाढती मागणी व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाची नितांत आवश्‍यकता आहे. तीनशे खाटांच्या रुग्णालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. रुग्णालय लवकरच आकाराला येईल." - ॲड. राहुल ढिकले, आमदार

Hospital
YIN Ministry : जिल्‍हाध्यक्षपदी वेदांत बच्‍छाव, कार्याध्यक्षपदी दर्शन देवरेची निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com