Nashik News: पटपडताळणीत 26 हजार विद्यार्थी गैरहजर; आदिवासी विभागाकडून पडताळणी अहवाल सादर

(File Photo)
(File Photo)esakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अखरित्याखालील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची एकाचवेळी पटपडताळणी करण्यात आली असून, यात सुमारे २५ हजार ७८० विद्यार्थी गैरहजर सापडले आहेत. विभागाने सदर अहवाल शासनाला सादर केला आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर ही चार अपर आयुक्त कार्यालये आणि ३० प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळा असून, यात साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. (26000 students absent in tribal department verification nashik news)

सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी समजून घेण्यासाठी व त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभागाने सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑगस्टमध्ये गणित आणि इंग्रजीची क्षमता चाचणी घेतली. त्यापाठोपाठ आश्रमशाळांमधील एकूण दहा हजार ४८८ शिक्षकांची परीक्षा विभागाने सप्टेंबरमध्ये घेतली होती.

यानंतर विभागाने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटपडताळणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी आदिवासी विभागांतर्गत शिक्षण विभागाने ५ ऑक्टोबरला ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली.

या पटपडताळणीचा अहवाल शिक्षण विभागाने तयार करत शासनाला सादर केला. यात शासकीय व अनुदानित मिळून एकूण चार लाख ४० हजार ९०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. प्रत्यक्षात पटपडताळणीत चार लाख १५ हजार १२४ विद्यार्थी उपस्थित, तर २५ हजार ७८० विद्यार्थी गैरहजर असल्याचे सापडले आहे. अहवालानंतर आता विभागाला पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.

(File Photo)
Pandharpur Wari: 15 वर्षांपासूनची पंढरपूरची वारी आली फळाला! विठूमाऊलीच्या कृपेने पायाचे दुखणे झाले बरे

शासकीय आश्रमशाळा

अप्पर आयुक्त एकूण विद्यार्थी हजर विद्यार्थी गैरहजर विद्यार्थी

नाशिक ९०७८९ ८७२२९ ३५६०

ठाणे ५६७९३ ५४१३६ २६५७

अमरावती ३०३८२ २७७०० २६८२

नागपूर २१३९२ १९५९८ १७९४

एकूण १९९३५६ १८८६६३ १०६९३

शासकीय अनुदानित आश्रमशाळा

अप्पर आयुक्त एकूण विद्यार्थी हजर विद्यार्थी गैरहजर विद्यार्थी

नाशिक ११३१५५ १०७४५५ ५७००

ठाणे ३९०१७ ३७३८७ १६३०

अमरावती ४८०३६ ४३४३२ ४६०४

नागपूर ४१३४० ३८१८७ ३१५३

एकूण २४१५४८ २२६४६१ १५०८७

(File Photo)
Nashik Leopard News: अंबड भागात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com