TET Exam | नाशिक जिल्ह्यातील २८ हजार ७२१ उमेदवार देणार परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 TET exam

नाशिक जिल्ह्यातील २८ हजार ७२१ उमेदवार देणार टीईटी परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे येत्या २१ नोंव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील यंदा २८ हजार ७२१ शिक्षक परीक्षा देणार आहेत. पेपर एकसाठी ४३ तर पेपर दोनसाठी ३८ पारीक्षा केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे. या परीक्षेच्या पहील्या पेपरसाठी १५ हजार १४४ तर दुसऱ्या पेपरसाठी १३ हजार ५७७ परीक्षार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकरी राजीव म्हसकर व परीक्षाप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी दिली.

राज्यात गेल्या ४ वर्षापासुन शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येत आहे. यंदा राज्यातुन सुमारे ३ लाखांपेक्षा जास्त परिक्षार्थी पारीक्षेसाठी बसले असले तरी गेल्या वर्षापेक्षा यंदा तब्बल एक लाखाने पारिक्षार्थीची संख्या घटली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन सुध्दा भरती होत नसल्यामुळे परीक्षार्थीची संख्या घटली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

असे होतील टीईटीचे दोन पेपर

साधारणपणे टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात.महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. १ ली ते ५ वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक १ देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी. एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणे तसेच शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असण् आवश्यक आहे.

हेही वाचा: पुन्हा युतीचे राज्य आले का? नाशिक शहरात खुमासदार चर्चा

परीक्षेचे स्वरूप

‘टीईटी’ परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित, परिसर अभ्यास या सर्व विषयांसाठी प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न सहा ते अकरा या वयोगटाशी संबंधित असतील. त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापनाचा समावेश असतो .

राज्यात परिक्षार्थीची संख्या घटली लाखाने

पात्रता परीक्षा देणाऱ्यांची संख्या या वर्षी कमी झाली आहे.मागील परिक्षेत सुमारे साडेचार लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

हेही वाचा: नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

loading image
go to top