Nashik Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

3 killed in accident on Pune Nashik highway accident news
3 killed in accident on Pune Nashik highway accident news

Nashik Accident News: आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जायखेडा (ता.बागलाण) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

तसेच क्रूझर गाडीतील पाच जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या घटनेने बागलाण तालुक्यात शोककळा पसरली आहे. (3 killed in accident on Pune Nashik highway accident news)

तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर २ जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रुझर गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे (वय ५०) सर्व रा. जायखेडा अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवारी (ता. १) पहाटेच्या सुमारास महामार्गावर धुके अधिक होते. त्यात वेगात असणाऱ्या क्रुझर गाडीने पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा गाडीत अडकून जागेवरच मृत्यू झाला.

3 killed in accident on Pune Nashik highway accident news
Nashik Accident News: वणी- सापूतारा रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहन चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली. क्रुझरचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

3 killed in accident on Pune Nashik highway accident news
Nashik Accident News: मनमाड-येवला मार्गावरील दोन अपघातांत नाशिकचे 5 तरुण, पुण्याचा एक जण ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com