जलसंपदा विभागाचे पदे धोक्यात

ZP Nashik
ZP Nashikesakal

नाशिक : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन विभागांचे एकत्रीकरण करून एकच विभाग अस्तित्वात आल्यानंतर त्या अनुषंगाने तब्बल 39 पदे संकटात आली असून ती पदे रद्द केली जाणार आहे.

जलसंधारण विभागाचे राज्यात २६ जलसंधारण अधिकारी व १२७ उपविभागीय अधिकारी कार्यालये तर जिल्हा परिषदचे ३१ जलसंधारण अधिकारी व १६८ उपविभागीय कार्यालये आहेत. राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने कार्यालयांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली व भंडारा जिल्ह्यात जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये व पदे निर्माण झाली. मात्र नवीन जलसंधारण कार्यालय निर्माण करताना नाशिक मधील जिल्हा परिषदेच्या पूर्व-पश्चिम विभागांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला .

दोन विभागांचे एकत्रीकरण करताना मात्र एकच जलसंधारण अधिकारी पद ठेवण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेत पंधरा तालुक्यांमधील १५ उपविभागीय अधिकारी कार्यालयांची संख्याही निम्म्याने घटवून सात करण्यात आली. त्यानुसार सध्या समायोजनाची प्रक्रीया सुरू आहे.

ZP Nashik
'आदिवासी विकास विभागाकडून' नियमांना फाटा

जिल्हा परिषदेच्या पूर्व व पश्चिम या दोन विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची ७८ पदे मंजूर होती. त्यातील ५० टक्के पदे रिक्त होती. ३८ कर्मचारी कारभार चालवत होती. समायोजन प्रक्रियेमुळे नवीन आराखड्यात ३९ पदे मंजूर करण्यात आल्याने जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात समायोजन करण्याची गरज भासली नाही. जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांची ३९ पदे कायमची रद्द झाली आहेत.

जलसंधारण उपविभागाचे नाव मुख्यालय

१ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, मालेगाव - तालुका कार्यक्षेत्र मालेगाव, नांदगाव

२ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, येवला - तालुका कार्यक्षेत्र येवला, निफाड

३ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, दिंडोरी तालुका कार्यक्षेत्र - दिंडोरी, पेठ

४ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, कळवण तालुका कार्यक्षेत्र - कळवण, सुरगाणा

५ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, इगतपुरी तालुका कार्यक्षेत्र - इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (हरसूल)

६ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, सटाणा तालुका कार्यक्षेत्र - सटाणा, देवळा, चांदवड

७ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, नाशिक तालुका कार्यक्षेत्र - नाशिक, सिन्नर

ZP Nashik
अनधिकृत शाळांवर कारवाईचे निर्देश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com