Nashik Crime News : वेगवेगळया घटनांमध्ये चौघांच्या आत्महत्त्या

death
death esakal

Nashik News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या सोमवारी चौघांनी गळफास घेत आत्महत्त्या केल्या आहेत. यात एक अकरावीची महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून, तिघे पुरुष आहे.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. (4 suicides in separate incidents in nashik news)

परिसरातील कन्या छात्रालयासमोरील झाडाला २९ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. गौतम ओमकार देहाडे (२९) असे मयत युवकाचे नाव आहे. गौतम याने गेल्या सोमवारी (ता. १) मातोश्री कन्या छात्रालयासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला फेट्याच्या कापडाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

लहवित येथे घरातील सर्व बाहेर गेलेले असताना १८ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. पायल बबन शेने (१८) असे मयत युवतीचे नाव आहे. पायल ही गेल्या सोमवारी (ता. १) घरात एकटीच होती. तिने अज्ञात कारणातून राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

आत्महत्त्येमागील कारण अस्पष्ट असून, घरात चिठ्ठीही मिळून आलेली नाही. पायल अकरावीच्या वर्गात शिकत होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक कारणातून गळफास घेत आत्महत्त्या केली. पंकज झा (४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

death
Nashik Crime News : पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा खून

पंकज यांनी गेल्या सोमवारी (ता. १) सकाळी राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला गळफास लावून घेतला. सदरची बाब मुलगा पार्थ याच्या लक्षात आल्यानंतर त्याने शेजारील बंटिधर जोशी यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. झा यांनी कौठुंबिक कारणातून आत्महत्त्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास इम्रान शेख हे करीत आहेत. सिडकोतील प्लंबिंग व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. विजय शिवलाल इखनकर (३७) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. इखनकर यांनी सोमवारी (ता. १) दुपारी बारा वाजेपूर्वी राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, आत्महत्त्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलीस नाईक किरण देशमुख हे तपास करीत आहेत.

पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यु

सिडकोतील शिवाजी चौकात राहत्या घरी पाय घसरून पडल्याने वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. बाळकृष्ण अंबादास नवलाक (७३) असे मयत वृद्धाचे नाव आहे. नवलाक हे गेल्या सोमवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरात पाय घसरून पडले असता, त्यांच्या डोक्यास मार लागला. त्यांना नातू अभिनव याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

death
Nashik Crime News : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com