Nashik Crime News : पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा खून

murder
murderesakal
Updated on

Nashik Crime News : दुचाकीच्या चाकात हवा भरली नाही, या कारणातून चौघांनी पंक्चर काढणाऱ्या कामगाराची चॉपर भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर रोड येथील जेजूरकर मळा-टाकळी लिंक रोडवर (ता. २९) रात्री दहाला घडली. (4 Persons killed puncture worker nashik crime news)

याप्रकरणी अवघ्या चार तासांत गुन्हे शाखा युनिट पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
यश कैलास पवार (वय १८, रा. संत कबीरनगर, द्वारका), प्रसाद रामनाथ पवार (वय २४, रा. शिवनगर) अशी संशयितांची नावे आहेत. एक अल्पवयीन मुलगा ताब्यात असून, विजय रामचंद्र पाटील या फरारी संशयिताचा शोध सुरू आहे.

रात्री साडेआठच्या सुमारास अल्पवयीन मुलगा, विजय पाटील, यश पवार हे मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात होते. त्यांनी याच परिसरात सर्व्हिस स्टेशनवर काम करणारा मित्र प्रसाद पवारला भेटण्यासाठी फोन केला. तो आल्यानंतर चौघे संशयित दुचाकीवरून जायला निघाले. परंतु टायरमधील हवा गेल्याने त्यांनी ऑटो केअर गॅरेजजवळ दुचाकी थांबवली.

गुलाम रब्बानी मोहमंद (मूळ रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) या कामगाराला ‘टायरात हवा भर’, असे म्हटले, मात्र गुलामने वॉल खराब झाल्याचे सांगितले. त्यातून गुलाम याच्याशी चौघांनी वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर चार संशयितांपैकी विजयने गुलामला मारहाण केली. त्यानंतर गुलामवर चॉपरने हल्ला केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

murder
Nashik Crime News : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चॉपरच्या हल्ल्यात गुलामचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मोरे, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख व गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ढमाळ घटनास्थळी पोचले.

गुन्हे शाखा एकचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक उपनिरीक्षक किरण शिरसाठ, प्रवीण वाघमारे, सुरेश माळोदे, शरद सोनवणे, रामदास भडांगे, संदीप भांड, धनंजय शिंदे, विशाल देवरे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, मोतीराम चव्हाण, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, गौरव खांडरे, आडगाव गुन्हे शोध पथक व पंचवटी शोध पथकाने संशयितांचा शोध घेतला. त्यांनी काही तासांतच दोन्ही संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

murder
Nashik Crime News : जेजुरकर मळा- टाकळी रोडवर एकाचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.